छत्रपती संभाजीनगर

२१ लाखाचा मुद्देमाल जप्त

CD
चार जुगार अड्डड्यांवर छापे, २१ लाखांचा मुद्देमाल जप्त --- सकाळ वृत्तसेवा लातूर, ता. १३ ः लातूरमध्ये चार ठिकाणी मटका व जुगार अड्ड्यांवर छापे टाकून २८ जणांवर कारवाई करीत २१ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नांदेड परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना पायबंद घालण्यासाठी उमाप यांनी अधिकारी व अंमलदारांचे एक पोलिस पथक लातूर जिल्ह्यात पाठवले होते. शनिवारी (ता.११) या पथकाने विवेकानंद चौक हद्दीतील माताजीनगर येथे पत्र्याचे शेडमध्ये गोविंद पाटील हे चालवत असलेल्या मटका बुकीवर कारवाई केली. यात सात हजार ४२० रुपये रोख व ४२ हजाराचे पाच मोबाइल जप्त केले. यात सहा जणावर विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला. कातपूर रोडवरील एका गाळ्यात प्रदीप पाटील व संतोष धनवे चालवत असलेल्या बेकायदेशीर ऑनलाइन लॉटरी सेंटरवर छापा मारून तीन लाख ६९० रुपये व साहित्य असा एकूण २४ हजार १९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला तर बार्शी रोडवरील प्रमोद पेट्रोल पंपासमोरील पत्र्याचे शेडमध्ये, अमितसिंग शरदसिंग बिसेन हे चालवत असलेल्या मटका बुकीवर या पथकाने कारवाई केली. यात अकरा हजार ८६० रुपये व ५० हजाराचे पाच मोबाइल, ७१ हजार ५०० रुपयांचे संगणक साहित्य जप्त केले. तसेच काळेगांव रोड येथील बांधकामाच्या ठिकाणी जुगार खेळणाऱ्यांविरुद्ध कारवाई करत दोन लाख ४४६ हजार ३०० रोख, १४ मोबाइल, दोन चारचाकी वाहने, सात मोटार सायकली असा एकूण १८ लाख ८१ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या चार कारवायात पथकाने २८ जणावर गुन्हे नोंद करुन दोन लाख ६९ हजार १९० रुपये रोख, २४ मोबाइल, दोन चारचाकी वाहने, सात मोटार सायकली, संगणक साहित्य असा एकूण २० लाख ८८ हजार ५९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या करिता पोलिस उपनिरीक्षक पंकज इंगळे, प्रदीप खानसोळे, गणेश राठोड व गजानन डवरे यांनी पुढाकार घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Social Media Election Rules : निवडणूक प्रचारात डीपफेक व्हिडिओ वापराल तर कारवाई; आयोगाचे राजकीय पक्षांना कडक निर्देश

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Chanakya Niti: नशीब बदलत नाही म्हणून निराश आहात? चाणक्य नीतीतील ‘या’ २ सवयी आजपासून अंगीकारा!

हरतालिकेची पूजा का करतात? एका क्लिकमध्ये वाचा व्रताचे महत्त्व!

Marathi News Live Updates : एनडीए "१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत देशभरात 'सेवा संकल्प' अभियान' राबवणार : अमित शहा

SCROLL FOR NEXT