छत्रपती संभाजीनगर

कधी उन्हाचा चटका तर कधी ढगाळ वातावरण उकडा वाढल्याने नागरिक घामाघुम; आता परतीच्या पावसाकडे लागले लक्ष

CD
अँकर १ --- पावसाळा कोरडा, वाढला उन्हाचा चटका लातूरकर घामाघूम; आता परतीच्या पावसाकडे लागले लक्ष --- सकाळ वृत्तसेवा लातूर, ता. ११ : यंदाच्या पावसाळ्यात लातूर जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरवली असून अद्याप समाधानकारक पाऊस झाला नाही. ऐन पावसाळ्यात लातूर शहर व परिसरात चक्क उन्हाचा चटका नागरिकांना जाणवत आहे. सकाळपासूनच वातावरण उष्ण होत असून दुपारच्या वेळी नागरिकांना कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे लातूरकर चांगलेच घामाघूम होत आहेत. मात्र, दुपारनंतर कधी ढगाळ वातावरण तर कधी पावसाचा शिडकावा अनुभवायला मिळत आहे. लातूर जिल्ह्यात मागील वर्षी दमदार पाऊस झाला. पण, यंदा पावसाने पाठ फिरवली आहे. पावसाळ्याचे जवळजवळ साडेतीन महिने संपले आहेत. मात्र, या कालावधीत दमदार पाऊस झाला नाही. त्यातच सप्टेंबर महिन्यात तापमान तुलनेने उंचावलेले असून सध्या कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअसपर्यंत पोचले आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यातच ऑक्टोबर हीटचा अनुभव येत आहे. गुरुवार (ता . १७) ते शनिवार (ता. १९) दरम्यान मध्यरात्री पावसाने हजेरीही लावल्याचे दिसून आले. दरम्यान, मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असून लातूरकरांचे लक्ष आता परतीच्या पावसाकडे लागले आहे. --- चौकट गारवा हरवला, उकाडा वाढला वातावरणातील गारवा कमी होऊन सध्या उन्हाळ्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळेच दुपारच्या वेळी टोप्या, उपरणे, गॉगल, स्टॉल असे साहित्य जवळ बाळगूनच नागरिक घराबाहेर पडत आहेत. उकाड्यामुळे ऐन पावसाळ्यात पंखे, कूलर लावण्याची वेळ आली आहे. मात्र, दुपारनंतर ढगळ वातावरण तर कधी पावसाचा शिडकावा अनुभवायला मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Moscow Drone Attack : रशियाची राजधानी हादरली! मॉस्कोवर युक्रेनच्या १००० ड्रोनचा हल्ला, ऑइल रिफायनरीलाही फटका, दोन ठार

Latur DCC Bank : संचालकपदावरून सहकारमंत्रीच बडतर्फ, कारवाई अयोग्य असल्याचा मंत्र्यांचा दावा; RBI विरोधात हायकोर्टात जाणार

Vastu Tips for Kitchen: फ्रिजच्या वर ‘या’ ४ वस्तू ठेवताय? आजच हटवा, होऊ शकतं मोठं नुकसान!

Marathi News Live Updates : मनसे नेते अमित ठाकरे यांनी घेतले दगडूशेठ गणपतीचे दर्शन

PM Kisan Yojana: खुशखबर! 'या' महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात येणार २००० रुपये; किसान योजनेबाबत मोठी अपडेट समोर

SCROLL FOR NEXT