छत्रपती संभाजीनगर

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी प्राचार्याचा शोध

CD
प्राचार्यास अटकेसाठी लातूरमध्ये मोर्चा -- अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचे प्रकरण, संस्थेच्या फलकावर शाईफेक -- सकाळ वृत्तसेवा लातूर, ता. ५ ः अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी येथील प्रकाशनगर भागातील आदर्श शैक्षणिक संकुलाचे प्राचार्य बशीर शेख याच्यावर येथील एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शेखचा शोध घेण्यासाठी पोलिसांची दोन पथके स्थापन करण्यात आली आहेत. शेखला अटक करून कठोर शिक्षा करावी, या मागणीसाठी नागरिकांनी आदर्श शैक्षणिक संकुलावर मोर्चा काढला. संस्थेच्या फलकावर शाई फेकत निषेध नोंदवला. दुसरीकडे या संस्थेच्या बार्शी मार्गावरील एका शाळेवर अनोळखींनी दगडफेक करीत काचा फोडल्या. आदर्श शैक्षणिक संकुलात दहावीपर्यंत शाळा आहे. या संस्थेचा चालक व प्राचार्य बशीर शेख याने अत्याचार केल्याप्रकरणी एका पीडित अल्पवयीन मुलीने तक्रार दिल्यावरून गुन्हा नोंद झाला होता. तेव्हापासून तो फरारी आहे. शहरातील काही कार्यकर्त्यांनी आदर्श शैक्षणिक संकुलावर मोर्चा काढला. प्राचार्याच्या विरोधात घोषणा दिल्या. मोर्चामुळे सकाळी मुलांना घरी सोडून देण्यात आले होते. या मोर्चेकऱ्यांनी संकुलाच्या फलकावर शाई फेकत निषेध व्यक्त केला. शिष्टमंडळाने नांदेड परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांची भेट घेत मागणीचे निवेदन दिले. ----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT