छत्रपती संभाजीनगर

लोकन्यायालयातून मालमत्ता कराची ५ कोटीची वसुली

CD
LTR12HTP09.jpg लातूर ः महापालिकेत आयोजित लोकन्यायालयात कराचा भरणा करताना नागरिक. यावेळी सेवानिवृत्त न्यायाधीश ए. पी. कुरेशी, उपायुक्त डॉ. पंजाबराव खानसोळे, रवी कांबळे आदी. -- लोकन्यायालयातून ५ कोटी मालमत्ता कराची वसुली -- सकाळ वृत्तसेवा लातूर, ता. १३ ः येथील महानगरपालिकेच्या वतीने मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी शनिवारी (ता. १२) महानगरपालिका मुख्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यातून सुमारे १ हजार ५०० मालमत्ता कर थकबाकीदारांकडून ५ कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल करण्यात आला. महानगरपालिकेच्या करसंकलन विभागाच्या वतीने मालमत्ता कर थकबाकीदारांना कर भरण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले. नागरिकांनी या संधीचा लाभ घेत आपली मालमत्ताकराची थकबाकी भरून महानगरपालिकेस सहकार्य केले. या लोकन्यायालयाकरिता जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या पॅनेलवरील सेवानिवृत्त न्यायाधीश ए.पी. कुरेशी उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांना मालमत्ता कर थकबाकी प्रकरणांबाबत मार्गदर्शन व आवश्यक सल्ला देण्यात आला. यावेळी महापौर जयश्री सोनकांबळे, उपमहापौर अ‍ॅड. स्नेहल उटगे, स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले, सभागृह नेते विजयकुमार साबदे, गट नेते दीपक मठपती तसेच इतर सन्माननीय नगरसेवकांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी नागरिकांचा सहभाग, करसंकलन विभागाची कार्यपद्धती आणि झालेल्या वसुलीची माहिती घेतली व थकबाकीदारांना प्रोत्साहित केले. दरम्यान रविवारी (ता. १३) एक दिवसाचे सूट योजनेस मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी उर्वरित थकबाकीदारानी या संधीचा लाभ घेऊन आपला थकित मालमत्ता कर भरावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Social Media Election Rules : निवडणूक प्रचारात डीपफेक व्हिडिओ वापराल तर कारवाई; आयोगाचे राजकीय पक्षांना कडक निर्देश

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Chanakya Niti: नशीब बदलत नाही म्हणून निराश आहात? चाणक्य नीतीतील ‘या’ २ सवयी आजपासून अंगीकारा!

हरतालिकेची पूजा का करतात? एका क्लिकमध्ये वाचा व्रताचे महत्त्व!

Marathi News Live Updates : एनडीए "१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत देशभरात 'सेवा संकल्प' अभियान' राबवणार : अमित शहा

SCROLL FOR NEXT