छत्रपती संभाजीनगर

पावसाळ्यात लातूरकरांना उन्हाचा चटका, वातावरणात उकाडा वाढला; दमदार पावसाकडे नागरिकांचे लक्ष

CD
लातूर : शहरात दिवसेंदिवस उष्णता वाढत आहे. त्यामुळे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी टोप्या परिधान केलेले दुचाकीचालक. ऐन पावसाळ्यात लातूरकरांना उन्हाचा चटका ------ वातावरणात वाढला उकाडा; दमदार पावसाकडे लक्ष --- सकाळ वृत्तसेवा लातूर, ता. ११ : पावसाने सर्वत्र पाठ फिरवली असून, जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पाऊस झाला नाही. पावसाळ्याचे दिवस सुरू असताना लातूर शहरासह जिल्ह्यात चक्क उन्हाचा चटका जाणवत आहे. सप्टेंबर महिन्यात तापमान ३१ अंश सेल्सिअस नोंदवले आहे. त्यामुळे पावसाळ्यातील गारवा कमी होऊन उन्हाळ्यासारखी स्थिती निर्माण झाल्याचा सध्या अनुभव येत आहे. त्यामुळेच दुपारच्या सत्रात टोप्या, उपरणे, गॉगल जवळ बाळगण्याची वेळ लातूरकरांवर आली आहे. दुपारच्यावेळी ज्येष्ठ, महिला, लहान मुलांना उष्णतेचा त्रास सहन करावा लागत आहे. आज लातूर शहरातील बाजारपेठेत दुपारी शुकशुकाट जाणवत होता. उकाड्यामुळे ऐन पावसाळ्यात पंखे, कूलर लावण्याची वेळ आली आहे. पावसाचा प्रदीर्घ खंड पडल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेतही भर पडत आहे. खरीप पिकांना सध्या पाण्याची गरज असताना पावसाअभावी पिकांनी माना टाकायला सुरवात केली आहे. अनेक ठिकाणी वाढत्या उष्णतेमुळे पिके करपून गेली आहेत. यंदाच्या मोसमात लातूर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत फारच कमी आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात तरी पाऊस येईल, अशी आशा शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BRICS Summit Food: सत्तू, मखाना अन् काश्मिरी पदार्थ... ब्रिक्स परिषदेतले शाही मेन्यू कोणते? नॉनव्हेज आहे का?

ST Bus Accident : येरमाळा घाटात बसचा अपघात! प्रवाशांनी प्रत्यक्ष मृत्यूचा साक्षात्कार अनुभवल्याची थरारक घटना, क्षणार्धात बस सुमारे २० ते २५ फूट खोल खड्ड्यात कोसळली

8 Feet Crocodile Spotted in Krishna River : औदुंबरच्या कृष्णा नदीच्या डोहात आढळली आठफुटी मगर; घाटावर दररोज उन्हात बसताना दिसल्याने भाविकांमध्ये खळबळ

Latest Marathi News Live Update : नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

Sudden Underarm Pain: काखेत अचानक दुखायला लागलंय? साधी वेदना समजून दुर्लक्ष करू नका; 'या' कारणांमुळे होऊ शकतो त्रास

SCROLL FOR NEXT