छत्रपती संभाजीनगर

लातूरची पाणीटंचाई मानवनिर्मित

CD
लातूरची पाणीटंचाई मानवनिर्मित? युवक संघटना ः ऊस, कारखान्यांच्या पाणीवापरावर प्रश्नचिन्ह -- लातूर, ता. १७ : लातूर जिल्ह्यासह शहरात निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईला केवळ नैसर्गिक परिस्थिती जबाबदार नसून, ही टंचाई मोठ्या प्रमाणात मानवनिर्मित असल्याचा आरोप शिवा लिंगायत युवक संघटनेने केला. सामान्य नागरिकांना आठवडाभर पिण्याच्या पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत असताना साखर कारखान्यांना पाणी उपलब्ध करून दिले जात असल्याचा दावा करत संघटनेने प्रशासनाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. संघटनेने अध्यक्ष दयानंद पाटील म्हणाले, लातूरसारख्या पाणीटंचाईग्रस्त भागात ऊस लागवड होत असल्याने उपलब्ध जलस्रोतांवर मोठा ताण निर्माण होत आहे. साखर उत्पादनासाठी पाण्याची आवश्यकता असल्याचे विविध अभ्यासांमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत पाणीवापराचे नियोजन करण्याची गरज असल्याचे संघटनेने म्हटले आहे. धरणांमधील उपलब्ध पाणीसाठा कमी होत असताना काहीजण कारखाने मृत साठ्यातून जॅकवेलद्वारे पाणी उपसा करीत असल्याचा आरोप दयानंद पाटील यांनी केला आहे. या आरोपांची प्रशासनाने तपासणी करून वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी, अशी मागणीही त्यांनी केली. जलसंकटावर कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी संघटनेने ऊस लागवडीसाठी ठिबक सिंचन बंधनकारक करावे, तीव्र पाणीटंचाई असलेल्या भागात नवीन साखर कारखान्यांना मंजुरी देऊ नये तसेच शेतकऱ्यांना कमी पाण्यात येणारी कडधान्ये, तेलबिया आणि फळबागांकडे वळण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. अन्यथा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rekha Gupta Organ Donation : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी रेखा गुप्तांचा मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प; नागरिकांनाही आवाहन

आमचे मार्ग आता जुळत नाहीत! Prithvi Shaw अन् आकृती अगरवाल यांचा वेगळा होण्याचा निर्णय; क्रिकेटपटूच्या पोस्टची चर्चा...

लग्नानंतर स्वयंपाक शिकली मेघना एरंडे; म्हणाली- माहेरची आणि सासरची लोकं गणेशोत्सवात आमच्या घरी येतात आणि...

Tata Sons Reappointment : RBI च्या निर्देशानंतर टाटा समूहात मोठा उलटफेर! नोएल टाटांचा विरोध डावलून एन. चंद्रशेखरन यांची अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती

NTA Exam Calendar 2026-27 Out : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! जेईई मेन, यूजीसी-नेटसह प्रमुख परीक्षांच्या तारखा जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक

SCROLL FOR NEXT