छत्रपती संभाजीनगर

लातुरात ‘चावी’ वाल्यांचीच दादागिरी

CD
LTR03HTP01.jpg लातूर ः महापालिकेच्या सार्वजनिक विंधन विहिरीच्या चाव्या नागरिकांच्याच हातात असल्याने त्यांचीच दादागिरी चालते. --- LTR03HTP02.jpg अनेकदा गाव भागात असे गटारीत पाणी सोडून देण्यात येते. ----------------- लातुरात ‘चावी’वाल्यांचीच दादागिरी! - बाराशे विंधन विहिरींवर महापालिकेचे नियंत्रणच नाही ----- हरी तुगावकर ः सकाळ वृत्तसेवा लातूर, ता. ३ ः शहरातील नागरिकांची पाण्याची गरज भागविण्यासाठी लातूर महानगरपालिकेच्या माध्यमातून सुमारे बाराशे विंधन विहिरी उभारण्यात आल्या आहेत. या विंधन विहिरींकडे मिनी वॉटर सप्लाय स्कीम म्हणून पाहिले जाते. मात्र, एवढ्या मोठ्या संख्येने विंधन विहिरी उपलब्ध असतानाही त्यांच्यावर महापालिकेचे प्रभावी नियंत्रण नसल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी विंधन विहिरींच्या चाव्याच नागरिकांच्या हातात असल्याने त्या-त्या भागातील चावीधारकांचीच दादागिरी सुरू आहे. याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे. -- नियंत्रणाची यंत्रणा बेपत्ता लातूरला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणातील पाणीसाठ्यावर टंचाईच्या काळात मोठा ताण येतो. अशा परिस्थितीत उपलब्ध प्रत्येक जलस्रोताचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. महापालिकेने उभारलेल्या विंधन विहिरी या शहरातील अनेक भागांसाठी महत्त्वाचा पर्यायी जलस्रोत ठरत आहेत. मात्र, विंधन विहिरींच्या वापराचे वेळापत्रक, पाण्याचे वितरण, देखभाल आणि नियंत्रण याबाबत महापालिकेची यंत्रणा प्रभावीपणे कार्यरतच नाही. --------- चाव्या स्थानिकांकडे काही भागांत विंधन विहिरी सुरू करण्याची किंवा बंद करण्याची चावी स्थानिक नागरिकांकडेच असल्याने पाणीपुरवठ्यावर त्याचा परिणाम होतो. परिणामी, विंधन विहिरीवर कोणाचा अधिकार, पाणी कधी सोडायचे आणि कोणत्या भागाला किती पाणी मिळणार, याबाबत स्थानिक पातळीवरच निर्णय घेतले जातात. त्यामुळे सर्व नागरिकांना समान पाणी मिळण्याच्या उद्देशालाच बाधा पोचत आहे. ---- स्वतंत्र यंत्रणा हवी सध्याच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर विंधन विहिरींकडे केवळ स्थानिक पातळीवरील व्यवस्था म्हणून न पाहता त्यांचे केंद्रिकृत नियोजन करण्याची गरज आहे. प्रत्येक विंधन विहिरीची स्थिती, उपलब्ध पाणी, वापराचे प्रमाण आणि संबंधित परिसरातील लोकसंख्या यांचा आढावा घेऊन पाणी वितरणाचे नियोजन करणे आवश्यक आहे. महापालिकेने प्रत्येक विंधन विहिरीवर स्वतःचे नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी केली पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026: हॉकीत भारतच आशियाचा राजा! महिलांनंतर पुरुष संघानेही जिंकलं गोल्ड मेडल; ऑलिम्पिक तिकीटही पक्के

Pune Teachers MLC election : महायुतीचे विधान परिषद जागावाटप निश्चित; हायव्होल्टेज पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपच्या वाट्याला; मंगेश चिवटे बंडखोरी करणार

Dilip Walse Patil : आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागातील लोणी-धामणी परिसरात दुष्काळाची तीव्रता जास्त; शासनाने नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची कार्यवाही सुरु केली

Sandeep Kshirsagar: आजीच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला आमदार क्षीरसागर जाणार नाहीत; 'त्या' व्यक्तीचं नाव पत्रिकेत येताच बीडचं राजकारण तापलं

Latest Marathi News Live Update : आरोपी नीलेश आरते याला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन

SCROLL FOR NEXT