वसुबारसेला वकिलांनी जपली
मुक्या जीवाची माणुसकी
बीड, ता. ८ : सणाच्या दिवशी देवपूजा करण्याची परंपरा असली, तरी मुक्या जीवाच्या वेदना समजून त्याची सेवा करणे हीच खरी माणुसकीची पूजा आहे. वसुबारसेच्या दिवशी बीड जिल्हा न्यायालयाच्या आवारात याचा प्रत्यय आला. अपघातात पायाला गंभीर दुखापत झाल्याने अनेक तास वेदनेने विव्हळत पडलेल्या गायीची न्यायालयातील वकिलांनी शुश्रूषा केली. उपचारांनंतर तिला सुरक्षित निवाऱ्यासाठी पेंडगाव येथील गोशाळेत दाखल केले.
न्यायालय परिसरात गाय पाच तास एकाच ठिकाणी पडून होती. तिला उठणेही शक्य होत नव्हते. तिची अवस्था पाहून वकिलांच्या पथकाने पुढाकार घेतला. दैनंदिन कामकाज बाजूला ठेवून पशुवैद्यकीय पथकाला बोलावले आणि गायीवर उपचार करून घेतले. उपचारांनंतरही दोन दिवस वकिलांनी तिच्या खाण्यापिण्याची आणि सुरक्षिततेची काळजी घेतली. बार असोसिएशनच्या कॅन्टीनमधील कर्मचाऱ्यांनी तिला चारा व पाणी दिले. मूळ मालकाचा शोध घेण्यासाठी सोशल मीडियावर आवाहन करण्यात आले; मात्र कोणीही पुढे आले नाही. त्यामुळे गायीची प्रकृती सुधारल्यानंतर तिला शहराजवळील पेंडगाव येथील राधे राधे गोशाळेत सुरक्षितपणे हलविण्यात आले.
उपक्रमात ॲड. दीपक कुलकर्णी, ॲड. अंकुशराव दराडे, ॲड. रमेश सोनवणे, ॲड. रणजित सोनवणे, ॲड. विकास मिसाळ, ॲड. यशवंत मुंडे, ॲड. सागर वायबट, ॲड. अजिंक्य सोनवणे, गोरक्षक पाळवदे आणि विजय गुरखुदे यांनी सहभाग घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.