छत्रपती संभाजीनगर

सर्वसामान्यांच्या दारी न्याय आणि प्रशासन खामकरवाडीत ‘विधी सहाय्यता केंद्रा’चे उद्घाटन

CD
सर्वसामान्यांच्या दारी न्याय आणि प्रशासन खामकरवाडीत ‘विधी सहाय्यता केंद्रा’चे उद्‍घाटन सकाळ वृत्तसेवा धाराशिव, ता. १८ ः सर्वसामान्य नागरिकांच्या कायदेशीर व प्रशासकीय समस्या थेट गावपातळीवरच मार्गी लागाव्या आणि शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी वाशी तालुक्यातील खामकरवाडी येथे ‘विधी सहाय्यता केंद्रा’चा प्रारंभ करण्यात आला आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या ६० दिवसांच्या विशेष महामोहिमेअंतर्गत हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (नवी दिल्ली), जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम १४ जानेवारी २०२७ पर्यंत राबविण्यात येत आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभिश्री देव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांच्या सहकार्याने या मोहिमेची अंमलबजावणी होत आहे. गावपातळीवरच मिळणार न्याय व मार्गदर्शन खामकरवाडी येथे पार पडलेल्या या उद्‍घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव भाग्यश्री पाटील होत्या. त्यांच्या हस्ते केंद्राचे उद्‍घाटन करण्यात आले. यावेळी त्या म्हणाल्या, की नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि प्रशासनासोबत समन्वय साधण्यासाठी या ६० दिवसांच्या कालावधीकरिता गावात विशेष ‘अधिकार मित्र’ नियुक्त करण्यात आले आहेत. ग्रामस्थांनी आपल्या कायदेशीर किंवा प्रशासकीय अडचणी या अधिकार मित्रांकडे मांडाव्यात, प्रशासनाच्या माध्यमातून त्यावर तात्काळ तोडगा काढला जाईल. यावेळी वाशीचे दिवाणी न्यायाधीश डी. जी. जगताप, उपजिल्हाधिकारी प्राजक्ता पाटील, मंडळ अधिकारी विजयमाला ढवारे, ग्राम महसूल अधिकारी अनुराधा देशमुख, कृषी सहायक पंडित, खामकरवाडीचे सरपंच गंगाराम शिंदे, ग्रामसेवक सरवदे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MG Road वरील खाऊ गल्लीत FDA ची धडक कारवाई; परवाना नसलेल्या पाच खाद्यविक्रेत्यांना व्यवसाय बंद करण्याचे आदेश

Yuzvendra Chahal 400 T20 Wickets: युझवेंद्र चहलने इतिहास रचला... ट्वेंटी-२०मध्ये असा पराक्रम करणारा पहिला भारतीय गोलंदाज

Youngest Demat Account Holder : वय अवघे ६ दिवस अन् थेट शेअर बाजारात एन्ट्री! १२ दिवसांचा जुना रेकॉर्ड मोडत दिल्लीच्या चिमुकल्याने रचला नवा विश्वविक्रम

Sudhir Mungantiwar : "आपलं सरकार इंग्रजांपेक्षाही वाईट..."; सुधीर मुनगंटीवार आक्रमक, मुख्यमंत्र्यांसमोरच मांडली भूमिका, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : सोनं-चांदी दरात पुन्हा घसरण; सोनं 2 हजार 800 रुपयांनी तर चांदी चार हजार रुपयांनी घसरली

SCROLL FOR NEXT