छत्रपती संभाजीनगर

बाजारात लिंबाची आवक घटली

CD
बाजारात लिंबाची आवक घटली ---- भाव २०० रुपये किलोवर ः उन्हामुळे फळगळ झाल्याने उत्पन्नावर परिणाम -------------------------------------- छत्रपती संभाजीनगर, ता. ६ : मागील महिनाभरापासून बाजारात लिंबाची आवक घटली आहे. दुसरीकडे मागणी वाढल्याने लिंबाच्या भावात मोठी वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी प्रतिकिलो ६० रुपयांवर असलेले लिंबू आता थेट २०० रुपये किलोवर पोचले आहे. त्यामुळे भाजीपाल्याच्या बाजारात लिंबाने सर्वाधिक भाववाढ नोंदविली आहे. यंदा आजवर समाधानकारक पाऊस झालेला नाही. सध्या आठवडाभरापासून कडक ऊन पडत आहे. फळगळीचे प्रमाण वाढल्याने लिंबाच्या उत्पादनावर परिणाम होत असल्याने बाजारातील लिंबाची आवक कमी झाली आहे. पंधरा दिवसांपूर्वी जाधवाडी भाजीमंडईत रोज लिंबाची आवक ३० ते ३५ क्विंटलपर्यंत होती. ती आता १० ते १५ क्लिंटलवर आली आहे. शनिवारी (ता. पाच) भाजीमंडईत १२ क्विंलट लिंबाची आवक झाली. त्यास दर्जानुसार प्रतिक्विंटल ११ ते १३ हजार रुपयांचा भाव मिळाला. परिणामी, किरकोळ बाजारात लिंबाच्या भावात तब्बल १४० रुपयांची वाढ झाली. सध्या किरकोळ बाजारात लिंबाला प्रतिकिलो २०० रुपयांचा भाव मिळत आहे. इतर भाजीपाल्याच्या भावातही काही प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळत आहे. ---- शेवगा १००, तर अद्रक २०० रुपये भेंडीचा भाव ४० वरून ५० रुपये, शेवगा ८० वरून १०० रुपयांवर पोचला आहे. कारल्याचे भाव ८० वरून ६०, कोबी ६० वरून ५०, हिरवी मिरची ७० वरून ६०, तर श्रावण घेवडा ८० वरून ६० रुपये प्रतिकिलो झाला आहे. अद्रकचा भाव २५० वरून २०० रुपयांवर आला आहे. ---- कंटुल्यात १०० रुपयांनी वाढ कंटुल्याचा भाव आता १८० वरून २८० रुपये प्रतिकिलो झाला आहे. लसूण ३०० ते ४०० रुपये किलोने बाजारात मिळत आहे. बाजारातील भाववाढीत सध्या लिंबू आणि कंटुले ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. ---- भाजीपाल्याचे भाव (प्रतिकिलो, रु.) बटाटे - २५ ते ३० कांदा - ६० भोपळा - ४० काकडी - ४० टोमॅटो - ४० वांगे - ६० भेंडी - ५० गाजर - ६० कारले - ६० कोबी - ५० वाल - ८० गिलके - ८० हिरवी मिरची - ६० सिमला मिरची - ६० दिलपसंद - ८० लिंबू - २०० दोडके - ८० शेवगा - १०० अद्रक - २०० लसूण - ३००- ४०० श्रावण घेवडा (बिन्स) - ६० कंटुले - २८०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : इन्स्टाग्रामवरील व्हिडिओच्या वादातून नववीतील विद्यार्थिनीवर चाकू हल्ला; बावधन परिसरातील शाळेतील घटना

बुध वक्री होताच वृषभसह ६ राशींच्या अडचणी वाढणार; व्यवसायाबाबत निर्णय घेताना सावधगिरी गरजेची

Anjali Arora controversial exit : ३ लाख रुपये घेतले अन् १२ व्या मिनिटाला स्टेजवरून पळाली; अंजली अरोराच्या 'त्या' नखऱ्यांमुळे आयोजकांचा मोठा दणका!

IMD weather forecast 24 October : २४ ऑक्टोबरला देशातील हवामानात मोठा उलटफेर; गुलाबी थंडी वाढणार की पावसाची एन्ट्री? पाहा हवामानाचा नवा अंदाज!

शिवरायांच्या स्वराज्याची शान! महाराष्ट्रातील ‘या’ 5 किल्ल्यांना एकदा तरी भेट द्याच

SCROLL FOR NEXT