छत्रपती संभाजीनगर

डाक विभागातर्फे ढाई आखर राष्ट्रीय पत्रलेखन स्पर्धा; विजेत्यांना मिळणार मोठी रोख पारितोषिके

CD
पत्र लिहा आणि जिंका ५० हजार रुपयांपर्यंतची बक्षिसे सकाळ वृत्तसेवा बीड, ता. ४ : भारतीय डाक विभागातर्फे राष्ट्रीय स्तरावर ढाई आखर या भव्य पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘धरतीमातेला पत्र : निसर्गाचे रक्षण करण्याचे माझे वचन’ हा या स्पर्धेचा मुख्य विषय असून, बीड डाक विभागाने जास्तीत जास्त नागरिकांना यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. ही स्पर्धा १८ वर्षांपर्यंत आणि १८ वर्षांवरील अशा दोन गटांत खुली असून, स्पर्धकांना कोणत्याही भाषेत आपले पत्र लिहिता येईल. पाकिटातील पत्रासाठी १,००० शब्दांची, तर अंतर्देशीय पत्रासाठी ५०० शब्दांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. स्पर्धकांनी आपले पत्र मुख्य पोस्टमास्टर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई - ४००००१ यांच्या नावे लिहून पोस्टातील विशेष पेटीत टाकायचे आहे. हे पत्र पाठवण्याची शेवटची मुदत ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत आहे. या पत्रलेखन स्पर्धेतील विजेत्यांना राज्यस्तरावर अनुक्रमे २५ हजार, १० हजार व ५ हजार रुपये, तर राष्ट्रीय स्तरावर तब्बल ५० हजार, २५ हजार आणि १० हजार रुपयांचे भरघोस रोख पारितोषिक दिले जाणार आहे. निसर्गाप्रती आपली बांधिलकी व्यक्त करत मोठी बक्षिसे जिंकण्याची ही उत्तम संधी असल्याने बीड जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने यात सहभागी व्हावे, असे आवाहन बीडचे डाक अधीक्षक एस. एन. आंबेडकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी पोलिसांच्या ताब्यात; सहाशेपेक्षा जास्त आंदोलकांना पोलिसांनी उचललं, आकाशवाणीजवळ दगडफेक

Balinga Dhonwade Road : कोल्हापूर-गगनबावडा महामार्गावरील दोनवडे-बालिंगा रस्त्याचे काम अपूर्ण; प्रशासनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात, कधी पूर्ण होणार काम?

मुंबईची मुलगी... रियाच्या घरी पोहोचले पोलीस! CJP आंदोलनाची केली चौकशी अन्... नेमकं काय घडलं? Video

Marathi News Live Updates : दिल्लीनंतर आता मुंबई-पुण्यातही आंदोलकांची धरपकड, १५० जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

''ज्या देशाने परकियांचा माज उतरवला, तिथे स्वकियांचा माज जनता उतरवणार नाही वाटतं का?'' राज ठाकरे संतापले...

SCROLL FOR NEXT