जन्मठेप!
जन्मठेप! Sakal
छत्रपती संभाजीनगर

जमिनीच्या वादातून खून करणारास जन्मठेप

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद - जमिनीच्या वादातून सावत्र भाऊजीचा चाकूने भोसकून खून करणाऱ्या आरोपी मेव्हण्याला जन्‍मठेप आणि विविध कलमांखाली सहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा जिल्‍हा व सत्र न्‍यायाधीश व्‍ही. बी. पारगावकर यांनी ठोठावली. विशेष म्हणजे पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या आरोपीच्या मोबाइल ट्रेसिंग डाटाच्‍या पुराव्‍यावरुन न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत ही शिक्षा ठोठावली आहे. अशा प्रकारे शिक्षा ठोठावण्याचे प्रमाण नगण्य असून हे त्यापैकीच एक आहे. आरोपी भरत बन्‍सी बारवाल (२४, रा. पळसगाव ता. खुलताबाद) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

याप्रकरणी मृत कचरुसिंग गुलचंद महेर (५५) यांचा मुलगा प्रेमसिंग कचरुसिंग महेर (२३, रा. निरगुडी पिंप्री, ता. खुलताबाद) यांनी फिर्याद दिली होती. त्‍यानुसार, फिर्यादीच्‍या वडीलांची आणि फिर्यादीचा सावत्र मामा तथा आरोपी भरत बारवाल याचे शेताच्‍या वाटणीवरुन न्‍यायालयात वाद सुरु होता. त्‍यात आरोपीच्‍या म्हणण्‍यानुसार शेतीच्‍या प्रकरणात तडजोड न केल्याने त्‍याचा राग आरोपीच्‍या मनात होता. २१ एप्रिल २०१७ रोजी फिर्यादीचे वडील कचरुसिंग महेर हे एकटे लेहा जहागिरी येथे लग्नासाठी गेले होते. ही संधी साधत आरोपीने साथीदारांसह कचरुसिंग यांच्‍यावर चाकूने हल्ला करुन त्‍यांचा खून केला. प्रकरणात वडोदबाजार पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला होता.

गुन्‍ह्याचा तपास सुरु असतांना पोलिसांनी आरोपीचा बारवालचा मोबाइल ट्रेस केला. त्‍यात गुन्‍ह्याच्या वेळी आरोपी हा घटनास्‍थळी असल्याचे समोर आले. त्‍यानंतर आरोपीनेही गुन्‍ह्याची कबुली दिली. आरोपींनी गुन्‍ह्यात वापरलेली दुचाकी, चाकू आणि आरोपी भरतने गुन्‍हा करतेवेळी परिधान केलेले कपडे पोलिसांनी जप्‍त केले. याप्रकरणात तत्कालीन सहायक निरीक्षक एस. डी. रमोड आणि उपनिरीक्षक ए. ओ. पठाण यांनी तपास करुन न्‍यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

खटल्याच्‍या सुनावणीवेळी सहायक लोकाभियोक्ता मधुकर आहेर यांनी १४ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. त्‍यात दोन साक्षीदार फितूर झाले. विशेष म्हणजे या खटल्यात मोबाईल कंपनीच्या नोडल ऑफिसरने सादर केलेल्या आरोपीच्‍या मोबाईलचे टॉवर लोकेशन आणि इतर परिस्थितीजन्य पुरावे महत्वाचे तसेच पंचासमोर केलेले निवेदन महत्वाचे ठरले. दोन्‍ही बाजूंच्‍या युक्तीवादानंतर साक्ष-पुराव्यांवरुन न्यायालयाने आरोपी भरत बारवाल याला दोषी ठरवून भादंवी कलम ३०२ नुसार जन्मठेप आणि पाच हजारांचा दंड तसेच कलम २०१ अन्‍वये दोन वर्षे सक्तमजुरी आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT