Sambhajinagar Crime sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Crime : नराधम पित्याला दोनदा मरेपर्यंत जन्मठेप ; पोटच्या मुलीवर अत्याचाराचे प्रकरण,सत्र न्यायालयाचा निकाल

पोटच्या सोळावर्षीय मुलीला मारहाण करून ठार मारण्याची धमकी देत अत्याचार करणाऱ्या नराधम पित्याला विविध कलमांखाली दोनदा मरेपर्यंत जन्मठेप आणि एक लाख दोन हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एस. वैरागडे यांनी बुधवारी (ता. २०) ठोठावली.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : पोटच्या सोळावर्षीय मुलीला मारहाण करून ठार मारण्याची धमकी देत अत्याचार करणाऱ्या नराधम पित्याला विविध कलमांखाली दोनदा मरेपर्यंत जन्मठेप आणि एक लाख दोन हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एस. वैरागडे यांनी बुधवारी (ता. २०) ठोठावली. या प्रकरणात पीडितेने फिर्याद दिली होती. त्यानुसार नराधम पिता आणि आई एका वीटभट्टीवर कामाला होते.

८ जून २०२२ रोजी सायंकाळी पीडिता खेळत असताना नराधम पिता दारू पिऊन घरी आला. पीडितेच्या आईने त्याला जेवण दिले. नराधमाने पीडितेला बळजबरी जेवणासाठी बसवले. जेवण झाल्यावर पीडितेला माझ्यासोबत वीटभट्टीवर बिऱ्हाड आणण्यासाठी चल म्हणून सोबत नेले. त्यानंतर आपण दुसऱ्या रस्त्याने घरी जाऊ, असे म्हणत वीटभट्टीपासून थोड्या अंतरावर असलेल्या तळ्याच्या बाजूला नेले.

आज इथेच मुक्काम करू म्हणत पीडितेवर बळजबरी सुरू केली. तिने विरोध करताच त्याने पीडितेला मारहाण केली. ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पीडितेच्या आईचे मामा काम करत असलेल्या वीटभट्टीवर नराधमाने पीडितेला सोडले. त्यांनी एवढ्या रात्री का आणले, असा प्रश्‍न केला असता, साहित्य घेण्यासाठी आणले होते, असे सांगत नराधमाने तेथून पळ काढला.

दुसऱ्या दिवशी पीडितेच्या आईने तिच्याकडे चौकशी केली असता, घडलेला प्रकार मुलीने सांगितला. या प्रकरणात खुलताबाद पोलिसात गुन्हा दाखल झाला. तपास अधिकारी तथा तत्कालीन निरीक्षक हातमोडे आणि उपनिरीक्षक मोरे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

खटल्याच्या सुनावणीवेळी सहायक लोकाभियोक्ता अरविंद बागुल यांनी दहा जणांच्या साक्षी नोंदविल्या. सुनावणीनंतर न्यायालयाने नराधम पित्याला दोषी ठरवून भादंवि कलम ३७६ (२)(एफ) अन्वये मरेपर्यंत जन्मठेप आणि ५० हजारांचा दंड तसेच कलम ३७६ (२) (एन) अन्वये मरेपर्यंत जन्मठेप आणि ५० हजार रुपये दंड, कलम ३२३ अन्वये तीन महिने सश्रम कारावास आणि एक हजारांचा दंड तसेच कलम ५०६ अन्वये एक वर्ष सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून पोलिस नाईक जबीर शेख यांनी काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT