Murder In Karmad Aurangabad  
छत्रपती संभाजीनगर

घराचे कौलारु काढून वेटर शिरला हॉटेलमालकिनीच्या बेडरुममध्ये अन्‌...(वाचा कुठे)

​ ​​​सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : हॉटेल मालकिणीचा गळा चिरून खून करीत तिच्या हातातील सोन्याची अंगठी पळवून नेल्याप्रकरणातील आरोपीला जन्मठेप व विविध कलमांअन्वये एक हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. एस. कुलकर्णी यांनी गुरुवारी (ता.26) ठोठाविली. विशेष म्हणजे गुन्ह्यातील दुसरा आरोपी बालाजी हा गुन्हा घडल्यापासून फरार आहे. त्याचा शोध घेण्यास अद्यापही पोलिसांना यश आलेले नाही. 

प्रकरणात करमाड परिसरातील ज्योती हॉटेलातील वाढपी नुपेंद्र गेंदालाल सहारे (वय 31, रा. तेलंगणा, हैदराबाद) यांनी तक्रार दिली होती. तक्रारीनुसार, ज्योती हॉटेलच्या मालकीण ज्योती मनोज नायर (45) या तीन जुलै 2017 ला नेहमीप्रमाणे त्यांनी नुपेंद्र सहारे, हॉटेलवरील स्वयंपाक मदतनीस तथा आरोपी राजू ऊर्फ लहू राठोड व बालाजी यांना जेवण करून झोपी जाण्याचे सांगितले. त्यानुसार नुपेंद्र सहारे हॉटेलातील एका खोलीत झोपी गेले; तर दोघे आरोपी दारू पीत बसले होते. बाहेरहून आल्यानंतर ज्योती नायरदेखील आपल्या बेडरूममध्ये झोपी गेल्या. चार जुलै 2017 च्या पहाटे तीनच्या सुमारास दोघा आरोपींनी स्वयंपाक घरातील चाकू व मिरची पूड घेत ज्योती यांच्या बेडरूमच्या छताचे कौलारू काढून त्यांच्या बेडरूममध्ये शिरले. ज्योती यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून चाकूने गळा चिरून त्यांचा खून केला; तसेच त्यांच्या हातातील बोटामध्ये असलेली सोन्याची अंगठीदेखील आरोपींनी काढून घेतली. त्यानंतर दोघे आरोपी हॉटेलवरील दुचाकी घेऊन पसार झाले होते. याप्रकरणी करमाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

तक्रारदाराने केली आत्महत्या 
खटल्याची सुनावणी सुरू असताना फिर्यादी नुपेंद्र सहारे यांनी मे 2019 मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, खटल्यात जिल्हा सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी 13 साक्षीदारांचे जबाब नोंदविले. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून भारतीय दंड संहिताच्या कलम 302 अन्वये जन्मठेप व 500 रुपये दंड, कलम 404 अन्वये एक वर्ष सक्तमजुरी व 500 रुपये दंडाची शिक्षा ठोठाविली. प्रकरणात देशपांडे यांना ऍड. सिद्धार्थ वाघ यांनी सहकार्य केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Opening: GSTमधील बदलांमुळे शेअर बाजार तेजीत; सेन्सेक्स-निफ्टीमध्ये तुफान वाढ, कोणते शेअर्स चमकले?

GST Council 2025: शेतकरी, महिला, विद्यार्थी, नोकरदार आणि व्यावसायिकांना काय फायदा होणार?

Teachers Day 2025 Marathi Wishes: शब्दांतून व्यक्त करा कृतज्ञता… या शिक्षक दिनी तुमच्या शिक्षकांना द्या खास शुभेच्छा!

Gold Rate Today : सोन्याने गाठला नवा उच्चांक, चांदीच्या भावातही तेजी; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

छ. संभाजीनगर हादरलं! खेळता खेळता जलवाहिनीच्या १५ फूट खोल खड्ड्यात पडून ३ वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

SCROLL FOR NEXT