Marriage sakal
छत्रपती संभाजीनगर

Marriage : आयुष्याचा जोडीदार म्हणून सहा धडधाकट व्यक्तींनी दिव्यांग व्यक्तीची केली निवड

भारतीय संस्कृतीत जोडीदाराला अर्धांगिनी म्हटले जाते. जिल्ह्यात यंदा एप्रिल ते ऑक्टोबरदरम्यान सहा धडधाकट व्यक्तींनी आपल्या आयुष्याचा जोडीदार म्हणून दिव्यांग व्यक्तीची निवड केली.

संदीप लांडगे

छत्रपती संभाजीनगर - भारतीय संस्कृतीत जोडीदाराला अर्धांगिनी म्हटले जाते. जिल्ह्यात यंदा एप्रिल ते ऑक्टोबरदरम्यान सहा धडधाकट व्यक्तींनी आपल्या आयुष्याचा जोडीदार म्हणून दिव्यांग व्यक्तीची निवड केली. त्यामुळे या व्यक्ती त्यांच्यासाठी अर्धांगिनी नव्हे ‘पूर्णांगिनी’च ठरल्या.

या दांपत्यांना जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडून ५० हजार रुपये प्रोत्साहन रक्कम दिली गेली.समाजातील दिव्यांग व्यक्तींना सर्वसाधारण व्यक्तीप्रमाणे आपले कौटुंबिक जीवन व्यतीत करता यावे, यासाठी दिव्यांग आणि दिव्यांग नसलेल्या व्यक्तींच्या विवाहास शासनाकडून प्रोत्साहन दिले जाते. शासनाकडून आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना ज्या प्रकारे आर्थिक साहाय्य केले जाते.

त्याचप्रमाणे दिव्यांग व अव्यंग व्यक्ती विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक साहाय्याची योजना सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत दिव्यांग-अव्यंग विवाहास प्रोत्साहन म्हणून ५० हजार रुपये अर्थसाहाय्य दिले जाते. यावर्षी छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाअंतर्गत दिव्यांग व दिव्यांग नसलेल्या सहा जोडप्यांनी अर्थसहाय्यतेसाठी अर्ज केले होते.

शासनाकडून प्रति जोडपे ५० हजार रुपये या प्रमाणे सहा जोडप्यांसाठी तीन लाख रुपये समाज कल्याण विभागाला प्राप्त झाले. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थींनी विवाह झाल्यानंतर किमान एका वर्षात जिल्हा परिषद समाजकल्याण कार्यालयात अर्ज करणे बंधनकारक आहे.

अशी मिळते आर्थिक मदत

या योजनेत लाभार्थींना रोख २० हजार देण्यात येतात. २५ हजार रुपयांचे बचत प्रमाणपत्र दिले जाते. साडेचार हजार रुपयांचे संसारोपयोगी साहित्य देण्यात येते. ५०० रुपये स्वागत समारंभासाठी दिले जातात. अशा एकूण ५० हजार रुपयांची मदत देऊन या जोडप्यांचा सत्कार केला जातो.

लाभाचे निकष

  • योजनेचा लाभ घेणारे दिव्यांग वधू-वर महाराष्ट्राचे रहिवासी असावेत

  • लाभार्थींपैकी कोणीही एक व्यक्ती ४० टक्के अथावा त्याहून अधिक दिव्यांग असावा.

  • वर-वधूचा हा प्रथम विवाह असावा.

  • वर किंवा वधू घटस्फोटीत असल्यास योजनेची यापूर्वी मदत घेतलेली नसावी.

  • विवाह हा कायदेशीररीत्या विवाह नोंदणी कार्यालयाकडे नोंदविणे आवश्यक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Konkan Railway: कोकण रेल्वेचा मोठा बदल! आता पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून धावणार गाड्या; नवा मार्ग कसा आहे? जाणून घ्या...

Stock Market Holiday: 3 एप्रिलला शेअर बाजार बंद? सलग 3 दिवस बाजार बंद राहणार! जाणून घ्या अपडेट

Latest Marathi News Live Update: मंगळवेढ्यात फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

Sinhgad Road News : वादळी वाऱ्यात झाड पडल्याने ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

IPL 2026 Marathi News : युवराज सिंग SRH मालकीण काव्या मारनवर नाराज; म्हणाला, अभिषेक शर्माने फ्रँचायझीसाठी ७ वर्ष घासली...

SCROLL FOR NEXT