छत्रपती संभाजीनगर

परभणीत लायन्स क्वेस्ट टीचर्स ट्रेनिंग वर्कशॉप उत्साहात

CD
PRB26B65881 लायन्स क्लबकडून शहरातील इंग्लीश स्कुलमधील ३० शिक्षकांना शिक्षण तज्ज्ञ डॉ. ज्योती तोष्णीवाल यांनी प्रशिक्षण दिले. ---------------- इंग्लिश स्कुलच्या ३० शिक्षकांना लायन्स क्लबकडून प्रशिक्षण परभणी, ता. ७ ः लायन्स क्बलच्या लायन्स क्वेस्ट टिचर्स ट्रेनिंग वर्कशॉप अंतर्गत शहरातील विविध इंग्रजी शाळांत अध्यापनाचे काम करणाऱ्या ३० शिक्षकांना अद्यावत प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणासाठी ओयासिस इंग्लिश स्कूल परभणी येथील २३ शिक्षक, अद्वैता स्कूल ऑफ एक्सलन्सचे ५ शिक्षक, लायन्स परिवारातील २ शिक्षक अशा एकूण ३० प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला. शिक्षण तज्ज्ञ व जागतिक पातळीवरील प्रशिक्षिका डॉ. ज्योती तोष्णीवाल यांनी प्रशिक्षण दिले. कार्यक्रमाच्या उद्‍घाटनप्रसंगी सुप्रीया कोतवाल उपस्थित होत्या. अशोक पांचाळ यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी सांभाळली. पंडित बरदाळे यांनी सहसमन्वयक म्हणून काम पाहिले. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी जयेशभाई ठक्कर, मनीष माखन, संध्या पारख यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी परभणी लायन्स परिवारातील डॉ. श्रीकांत मनियार, अशोक सोनी, शंकर गुजराती, अवि टाक, प्रदीप गोलेच्छा, उदय जैन, सुनील मोडक, विजय कुचेरिया, विशाल वट्टमवार, सुनील मुथा, जगदीश मुंदडा, सुभाष इंगळे, एम. जे. एफ. सतीश चौधरी, श्रीराम गर्जे, प्रवीण धाडवे, के.के. पाटील, संभाजी शेवटे, सुधाकर आंदोले, विजय श्रीमाळी, सुहास बिडकर, रुस्तुम कदम, महेंद्र मोताफळे, भालचंद्र खानापुरे, भगवान पूर्ण, चंद्रकांत कारवार, अनिल धुतमल, अर्जुन वसमतकर, सुभाष चलवदे यांच्यासह लायन्स क्लब परभणीचे सदस्य उपस्थित होते. लायन्स क्लब परभणीच्या सदस्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केले. --------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : 'कोणी मायका लाल आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही'; एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही केलं भाष्य

CJP Jantar Mantar Protest: शनिवारी सीजेपीचं पुन्हा 'जंतरमंतर'! मुख्य प्रवक्ते सौरव दास दिल्ली पोलिसांच्या भेटीला, म्हणाले...

केस गळायला लागले, विग बनवून घेतले तरीही सोनाली बेंद्रेने ते घातलेच नाहीत, पण का? म्हणाली, 'बोलायला खूप सोपं वाटतं पण...

IND vs WI 2nd T20I: नितीश रेड्डी, प्रिन्स यादव IN, वैभव सूर्यवंशी बाकावरच; दुसऱ्या ट्वेंटी-२० साठी Playing XI मध्ये सूचवला बदल

Latest Marathi News Live Update : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावाच लागेल - राहुल गांधी

SCROLL FOR NEXT