sambhaji nagar sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar News : लायन्सच्या मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराला प्रारंभ

४७२ रुग्णांची तपासणी, ३५० रुग्णांवर होणार शस्त्रक्रिया

सकाळ वृत्तसेवा

छ्त्रपती संभाजीनगर : लायन्स क्लब औरंगाबाद-चिकलठाणातर्फे आणि महात्मा गांधी मेमोरियल रिसर्च सेंटर तसेच औरंगाबाद ड्रगिस्ट अँड केमिस्ट असोसिएशन यांच्या सहकार्याने डॉ. शरदकुमार दीक्षित यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित ४७ व्या मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचे उद्‍घाटन लायन्स प्रांतपाल सुनील देसरडा यांच्या हस्ते बुधवारी (ता.१३) करण्यात आले.

सिडकोतील लायन्स आय हॉस्पिटल येथे झालेल्या या कार्यक्रमावेळी व्यासपीठावर अमेरिकेहून आलेले डॉ. राज लाला, लायन्स प्रांतपाल सुनील देसरडा, डॉ. अमित बसन्नवार यांच्यासह क्लबच्या अध्यक्ष डॉ. उज्वला दहीफळे, प्रकल्प प्रमुख भूषण जोशी, एमजीएमचे डीन डॉ. राजेंद्र बोहरा, ड्रुगिस्ट अँड केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष नितीन देशमुख, क्लब सचिव संदीप ताठे, सिटी क्लबचे रवी राजपाल यांची उपस्थिती होती.

यावेळी गोरगरीब रुग्णांच्या चेहऱ्यावर हसू फुलविणाऱ्या, त्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करणाऱ्या प्रकल्पाला डॉ. शरदकुमार दीक्षित यांच्या थोर आणि समर्पणभावनेच्या कार्याची असलेली परंपरा अशीच पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.

या शिबिरात नाकावरील बाह्य विकृती, चेहऱ्यावरील व्रण व डाग, दुभंगलेले ओठ, पडलेली पापणी आदींवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. उदघाटन कार्यक्रमानंतर लगेच रुग्णांच्या तपासणीला प्रारंभ करण्यात आला. बुधवारी ४७२ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३५० रुग्णांवर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. पुढील चार दिवसात एमजीएम हॉस्पिटलमध्ये या शस्त्रक्रिया होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: सरकारकडून अपेक्षाच उरल्या नाहीत..., विद्यार्थ्यांना झालेली अमानुष मारहाणीवर राज ठाकरे चिडले

Student Protest: "आजच्या तरुणांना दडपणे अन् त्यांचे ब्रेनवॉश करणे, यशस्वी होणार नाही," भारतीय क्रिकेटपटूने सरकारला दाखवला आरसा

Latest Marathi News Live Update : CJP च्या शिष्टमंडळाची सरकारसोबतची बैठक संपली, नेमकी काय चर्चा झाली?

MHADA Sangli Housing : अवघ्या 15 लाखांत हक्काचं घर! 'म्हाडा'चा 354 कुटुंबीयांना निवारा, 'या' योजनेतून अनेकांची स्वप्नपूर्ती; सांगलीत घरांची बंपर लॉटरी

Ekadashi Horoscope : उद्या देवशयनी एकादशीला बनतोय दुर्मिळ योग! 'या' 5 राशीच्या लोकांची मोठी इच्छा होणार पूर्ण; धनलाभ ठरेल गेमचेंजर

SCROLL FOR NEXT