छत्रपती संभाजीनगर

जालना जिल्ह्यात मंडळनिहाय चारा छावण्या तातडीने सुरू करा, भाऊसाहेब घुगे यांचे पालकमंत्री पंकजा मुंडे यांना निवेदन

CD
मंडळनिहाय चारा छावण्या सुरू करा भाऊसाहेब घुगे यांचे पालकमंत्री पंकजा मुंडे यांना निवेदन बदनापूर, ता. ४ (बातमीदार) : जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी चारा व पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील आठही तालुक्यांत मंडळनिहाय चारा छावण्या तातडीने सुरू कराव्यात, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांनी केली. याबाबत गुरुवारी (ता. एक) मुंबईतील रामटेक बंगल्यावर पालकमंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेऊन त्यांनी निवेदन दिले. जालना, बदनापूर, भोकरदन, जाफराबाद, अंबड, घनसावंगी, परतूर व मंठा तालुक्यांत अपेक्षित पाऊस न झाल्याने अनेक भागांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नदी-नाले, तलाव व जलसाठे पुरेशा प्रमाणात भरले नसल्याने पशुधनासाठी पाणी व चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. प्रत्येक महसूल मंडळात किमान एक चारा छावणी सुरू करून तेथे पुरेसा चारा, स्वच्छ पिण्याचे पाणी व आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. टंचाईची तीव्रता अधिक असलेल्या भागांत गरजेनुसार अतिरिक्त छावण्या सुरू कराव्यात. तसेच जिल्ह्यातील परिस्थितीचा तातडीने आढावा घेऊन शेतकरी व पशुपालकांना आवश्यक मदत द्यावी, अशी मागणीही करण्यात आली. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रवीण फुके, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुभाषराव बोडखे आणि प्रगतिशील शेतकरी रामेश्वर दराडे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar: ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढणारं २० वर्षे जुनं प्रकरण काय? PWD कनेक्शन नेमकं काय?

सिल्लोड-जळगाव महामार्गावर भीषण अपघात; पालोद येथे भरधाव ट्रकच्या धडकेत १५ वर्षीय बालकाचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : धुळ्यात महसूलमंत्री बावनकुळेंनी अधिकाऱ्याची शेतातच घेतली ‘शाळा’

Noida Crime : सातव्या महिन्यातच मुलाचा जन्म, उपचारासाठी खर्च झाले ४० लाख; इंजिनिअरने कर्ज, तवाणावातून ४३ व्या मजल्यावरुन उडी मारुन जीवन संपवले

Pitru Paksha 2026: सर्वपित्री अमावस्येला नवरात्रीच्या पूजेचे सामान खरेदी करावे की नाही? जाणून घ्या नियम...

SCROLL FOR NEXT