छत्रपती संभाजीनगर

मायक्रो फायनान्स कंपन्यांनो जोर-जबरदस्तीने वसुली नको अन्यथा कारवाई,

CD
जबरदस्तीने वसुली नको, अन्यथा कठोर कारवाई ----- अग्रणी बॅंकेच्या अधिकाऱ्यांची माहिती ------- सकाळ वृत्तसेवा धाराशिव, ता. २७ ः जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता खासगी सावकारी आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कर्जवसुलीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी आणि रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुढील पाच ते सहा महिने (मार्चपर्यंत) मायक्रो फायनान्स कंपन्यांनी वसुलीसाठी बळजोरी करू नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. दुष्काळी स्थिती पाहता कर्जवसुलीची प्रक्रिया अत्यंत मवाळ पद्धतीने करावी. जे शेतकरी व ग्राहक पैसे देऊ शकतात, त्यांच्याकडून घ्यावे. मात्र, जे देऊ शकत नाहीत त्यांच्यावर कोणतीही जबरदस्ती करू नये. वसुली एजंट्सनी कोणत्याही शेतकऱ्याच्या किंवा ग्राहकाच्या घरासमोर दहा मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबू नये. दोन-तीन तास घरी बसून अनावश्यक मानसिक दबाव निर्माण करण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. जर मायक्रो फायनान्स कंपन्यांनी आपल्या वसुलीच्या पद्धतीत बदल केला नाही, तर कठोर कारवाई केली जाईल आणि संबंधितांचे परवानेदेखील जप्त करण्यात येऊ शकतात, असा इशारा देण्यात आला आहे. मायक्रो फायनान्स कंपन्यांनी मार्चपर्यंत वसुलीसाठी सक्ती न करता नरमाईची भूमिका घ्यावी आणि महिला भगिनी व शेतकऱ्यांना सहकार्य करावे, असे स्पष्ट निर्देश प्रशासनाकडून देण्यात आल्याची माहिती जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक कुमुद रंजन पांडा यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उत्तर प्रदेशसह 5 राज्यांतील विधानसभा निवडणुकांसंदर्भात आयोगाचं मोठं पाऊल; पाचही राज्यांच्या मुख्य सचिवांना महत्त्वाचे निर्देश

Land Rover Defender: 'डिफेंडर' प्रेमींसाठी गुड न्यूज! गाडीची किंमत तब्बल ३४ लाखांनी कमी कशी झाली?

Scholarship Exam : इयत्ता चौथी आणि सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा २१ फेब्रुवारीला होणार

Latest Marathi News Live Update : अमरावती शिक्षक मतदार संघ निवडणूक; महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक 1694 मतांनी आघाडीवर

IND vs NZ T20: यांना रोखणं अवघड... किवी कर्णधाराची बोलती बंद; श्रेयस अय्यर म्हणाला, अभिषेक-वैभवने हे कसे केले याचे मला आश्चर्य

SCROLL FOR NEXT