छत्रपती संभाजीनगर

कर्जमाफीच्या एसओपीचा वारसांना फटका; बँकांकडून अडवणूक! मयत शेतकऱ्यांच्या वारसांची कागदपत्रांसाठी फरफट; नियमावलीत सुधारणा करण्याची आश्रुबा बिक्कड यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

CD
कर्जमाफीच्या एसओपीचा वारसांना फटका! मृत शेतकऱ्यांच्या वारसांची बँकांकडून अडवणूक होत असल्याचा आरोप कळंब, ता. १५ (बातमीदार) : दुष्काळाच्या फेऱ्यात सापडलेल्या शेतकरी कुटुंबांना कर्जमाफीचा दिलासा मिळण्याची अपेक्षा असताना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ मधील मानक कार्यप्रणाली (एसओपी) मृत शेतकऱ्यांच्या वारसांसाठी अडथळा ठरत असल्याचा मुद्दा समोर आला आहे. या नियमावलीतील तरतुदींमुळे बँकांकडून वारसांची अडवणूक होत असल्याचा आरोप करत आश्रुबा बिक्कड यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे नियमांमध्ये सुधारणा करण्याची मागणी केली आहे. वारसांना कर्जमाफीचा लाभ मिळवताना संमतीपत्रे, प्रतिज्ञापत्रे आणि अन्य कागदपत्रांची पूर्तता करताना अडचणी येत आहेत. एकाच कुटुंबातील वारस वेगवेगळ्या ठिकाणी राहत असल्याने सर्वांची संमती मिळवणे, कागदपत्रे गोळा करणे आणि बँकेत उपस्थित राहणे जिकिरीचे ठरत आहे. काही वारस अल्पवयीन असल्याने स्वतंत्र बँक खाते उघडण्याची प्रक्रियाही अडचणीची ठरत आहे. परिणामी, पात्र लाभार्थींना कर्जमाफीसाठी कागदपत्रांची पूर्तता करताना मनस्ताप सहन करावा लागत आहे. एका वारसाच्या खात्यावर लाभ देण्याची मागणी मृत शेतकऱ्याच्या सर्व वारसांची संमती आणि प्रतिज्ञापत्र घेऊन त्यांपैकी एका वारसाची मुख्य वारस म्हणून नोंद करण्याची तरतूद एसओपीमध्ये करावी, अशी मागणी बिक्कड यांनी केली आहे. सर्व वारसांची संमती घेतल्यानंतर पात्र कर्जमाफीचा लाभ एका वारसाच्या कर्जखात्यावर वर्ग करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे. अशा बदलामुळे वारंवार कागदपत्रे सादर करण्याची गरज कमी होईल आणि बँकांतील प्रक्रियाही सुलभ होईल. कर्जमाफीचा निर्णय होऊनही नियमांच्या कचाट्यात अडकणाऱ्या शेतकरी कुटुंबांना दिलासा देण्यासाठी शासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि एसओपीमध्ये आवश्यक सुधारणा कराव्यात, अशी मागणी बिक्कड यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army Alert: भारतात घुसण्यासाठी 500 दहशवादी रेडी! 'पीओके'मध्ये लपून बसल्याची माहिती; लष्कराकडे महत्त्वाचे इनपुट्स

US Work Permit Rules: ट्रम्प यांचा भारतीयांना मोठा झटका! वर्क परमिट संपल्यावर नोकरी जाणार?

Mumbai: १० वर्षीय मुलीनं १८ महिन्यांच्या बाळाला इमारतीवरून खाली फेकलं, गोरेगावात काळजाचा थरकाप उडवणारी घटना

Bank Holiday: 15 ते 31 ऑक्टोबरदरम्यान बँकांना 12 दिवस सुट्ट्या! महाराष्ट्रात कधी बंद राहणार बँका? पाहा संपूर्ण यादी

Latest Marathi News Update : जुन्नर तालुक्यात खरीप पिकांचे पंचनामे आजपासून सुरू

SCROLL FOR NEXT