Aurangabad News 
छत्रपती संभाजीनगर

लॉकडाऊनच्या अफवेने बाजारात तोबा गर्दी; जुना मोंढा, शहागंजमधील किराणा दुकाने फुल्ल

प्रकाश बनकर

औरंगाबाद : शहरात दोन दिवसात लॉकडाऊन लागणार असल्याची शनिवारी (ता.६) दुपारपासून अफवा पसरली. लॉकडाऊनच्या भितीने अनेकांनी किराणासह इतर साहित्य खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. जुना मोंढ्यातील किराणा मार्केट, शहगंज येथील मार्केटमध्ये पाय ठेवायलाही जागा नव्हती. अनेकांनी महिनाभराचे साहित्य खरेदी करून ठेवल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.


दुपारनंतर अचानकपणे वाढलेल्या गर्दीमुळे किराणा व्यापाऱ्यांचा मोठा गोंधळ उडाला होता. अनेक ठिकाणी साहित्य खरेदीसाठी नागरिकांना वेटिंग करावी लागली. जुना मोंढा, औरंगपूरा, शहागंज, पीरबाजार, रेल्वेस्टेशन भाजीमंडई, जुना मोंढा येथील दुकानांसह शहराच्या सर्वच भागातील किराणा दुकानांवर जीवनाश्यक वस्तू खरेदीसाठी ग्राहकांची रिघ लागली. सर्व ग्राहकांच्या हातात साहित्याची लांबलचक यादी होती. भाजी मंडई, तेल भंडार, सर्व दुकानांमध्ये आज दिवाळीप्रमाणे गर्दी झाली होती. रात्री आठ ते नऊपर्यंत गर्दी कायम होती. मॉल, मोठ्या शॉप्समध्येही गर्दी दिसून आली. दिवाळीच्या काळात ज्या प्रमाणे खरेदीसाठी गर्दी असते अगदी तशीच गर्दी बाजारपेठेत झाली असल्याचे व्यापारी दिलीप गांधी यांनी सांगितले.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सिलिंडरचा काळाबाजार! एकाच घरात सापडले विविध कंपन्यांचे ४० सिलिंडर अन् २३ रेग्यूलेटर, गुन्हे शाखेची कारवाई...

Numerology : 'या' 3 मूलांकाचे लोक सगळ्यात जास्त खोटं बोलतात; स्वार्थापायी करतात दुसऱ्यांचे नुकसान, सहज कुणालाही फसवण्याची वृत्ती

गॅस कनेक्शन बंद करण्याची भीती; डोंबिवलीत महिलेला ३ लाखांचा गंडा, ‘महानगर गॅस’च्या नावाने फसवणूक

BMC रोज पाणीपुरवठा करते, तरीही मुंबईला पाणी कमी का पडते? मोठे स्पष्टीकरण देत महायुती सरकारने सांगितली खरी कारणे

Santosh Deshmukh Case: ऐनवेळी प्लॅन बदलला! संतोष देशमुख प्रकरणातील आरोपीला १० कमांडोंच्या गराड्यात गावात नेलं अन्...

SCROLL FOR NEXT