lockdown Aurangabad 
छत्रपती संभाजीनगर

Lockdown in Aurangabad: सामाजिक संघटनांचाही लॉकडाऊनला विरोध

शेखलाल शेख

औरंगाबाद: जिल्ह्यात ३० मार्च ते ८ एप्रिल पर्यंत लॉकडाऊन जाहिर करण्यात आले आहे. त्याला शहरातील सामाजिक संघटना तसेच काही राजकीय पक्षांनी विरोध दर्शवत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. कडक लॉकडाऊन लादल्याने सर्वाधिक गरीबांचे हाल होतात. दररोज मजुरी करणारे मजुर त्यांना बाहेर पडता येत नसल्याने त्यांच्या दोन वेळच्या भाकरीचा प्रश्‍न निर्माण होतो.

कोरोना रुग्णांना वेळेवर उपचार मिळाले पाहिजे, याकडे अगोदर लक्ष देण्याची गरज आहे. या विषयी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अब्दुल कदीर मौलाना म्हणाले की, गरीबांच्या अन्नाची व्यवस्था कोण करणार आहे. हे प्रशासनाने आधी स्पष्ट करावे. लॉकडाऊनच्या धास्तीने गरीबांची झोप उडाली असून अनेक जण मानसिक रोगी बनत आहे. यातून मार्ग काढणे आवश्‍यक आहे. सोशल डिस्टन्स, मास्क, सॅनिटायझरचा वापर, जनजागृती सुरु आहे. पण लॉकडाऊन हा पर्याय नाही.

यावेळी इलियास किरमानी, हाफिज इकबाल अन्सारी, वाजेद कादरी, वंचित बहुजन आघाडीचेचे सुनील वाकेकर, योगेश बन, हाफीज अब्दुल अजीम, ॲड. फैज, अब्दुल रशिद मदनी, मोहसिन अहेमद, एजाज जैदी, सलीम सिद्दीकी, शेख मसूद, मसिओद्दीन उर्फ मश्शू, मोहंमद ताहेर, अब्दुल हई कादरी, जमील सानी व सामाजिक, आरोग्य, स्वयंसेवी संस्था, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CIDCO: आनंदाची बातमी! सिडकोने गृहकर्ज मर्यादा वाढवली; आता घर खरेदीचे स्वप्न पूर्ण होणार, व्याजदर अन् नवीन लिमिट किती?

Gudi Padwa 2026: भोपाळमध्ये 'मराठी' थाट! मुख्यमंत्र्यांनी घातली पेशवाई पगडी; ढोल-ताशांच्या गजरात गुढी उभारून केले नववर्षाचे स्वागत

Crime News : नाशिकमध्ये गॅस सिलिंडरचा काळाबाजार उघड! सातपूरमध्ये २५ लाखांच्या मुद्देमालासह ७ जणांना बेड्या

Prajwal Revanna Case : 13 हजार पानांचं आरोपपत्र, 70 पेनड्राइव्ह, 39 आरोपी अन् अंगावर काटा आणणारे पुरावे; माजी खासदाराच्या 'त्या' अश्लील व्हिडिओंचं सत्य समोर!

माझी ओळख, माझे नाव, माझा चेहरा... गौतम गंभीरची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; २.५० कोटींचा नुकसानीचा दावा, नेमकं काय प्रकरण?

SCROLL FOR NEXT