Voting sakal
छत्रपती संभाजीनगर

Loksabha Election 2024 : मतांचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासन सज्ज; जनजागृती करण्यावर दिला भर

औरंगाबाद मतदार संघात टक्का वाढवण्यासाठी प्रशासनाकडून फार मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यावर भर दिला जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर - इतर मतदार संघात मतदानाचा टक्का कमी झाल्याने औरंगाबाद मतदार संघात टक्का वाढवण्यासाठी प्रशासनाकडून फार मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यावर भर दिला जात आहे; तसेच विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत.

आता घरोघरी जाऊन मतदारांना ‘चला चला मतदानाला’ हा उपक्रम राबवून त्यांचे प्रश्न, अडचणी समजून घेऊन त्यांच्यातील मतदानाविषयीची नकारात्मक भावना, उदासीनता दूर करण्यात येणार आहे.

लोकसभेच्या औरंगाबाद मतदार संघाची टक्केवारी घसरू नये, यासाठी उपाययोजना राबविल्या जाणार असल्याचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी शुक्रवारी (ता. तीन) संवाद सेतू उपक्रमात माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

ते म्हणाले, ‘मतदारांना चला चला मतदानाला असे घरोघरी जाऊन आवाहन आहे. अनेक मतदारांच्या मतदानाविषयी काय भावना आहेत, त्यांनी मतदान करण्यासाठी प्रवृत्त व्हावे यासाठी त्यांच्या भावना जाणून घेतल्या जाणार आहेत.

मतदान केंद्र तसेच मतदानाबाबत सार्वजनिक प्रसिद्धी व्हावी, वातावरण निर्मिती व्हावी आणि यामुळे आपण मतदान करायला गेले पाहिजे ही भावना मतदारांमध्ये वाढावी यासाठी मतदार जागृतीसाठी विविध माध्यमांचा वापर केला जाणार आहे. विधानसभेच्यावेळी जिथे सर्वांत कमी मतदान झाले होते त्या मतदान केंद्रांचा अहवाल मागवण्यात आला असून, तिथे का मतदान कमी झाले होते आणि ते कसे वाढवता येईल यासाठी प्रयत्न केले जात आहेत.’’

चंद्रपूरहून आल्या १,३०० ईव्हीएम

उमेदवारांची संख्या वाढल्याने आता प्रत्येक मतदान केंद्रांवर एक ईव्हीएमच्या (इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन) ऐवजी तीन ईव्हीएम लागणार आहेत. २०४० मतदान केंद्रासाठी २०४० त्याशिवाय आता ४८९८ वाढीव अशा ६९३८ ईव्हीएम लागणार आहेत. यासाठी चंद्रपूर येथून १३०० ईव्हीएम प्राप्त झाल्या आहेत. त्यांच्या तपासणीचे काम सुरू आहे. कंपनीचे १२ अभियंते या मशीनची तपासणी करत असल्याचे स्वामी यांनी सांगितले.

गाजावाजा करा

मतदानाविषयी उत्सुकता निर्माण व्हावी, यासाठी मतदान केंद्र स्थापनेचा लेझीम पथक, बँड, हलगी, ढोलताशांच्या गजरात गाजावाजा करावा. मतदारांना मतदान केंद्रांवरील सुविधांबाबत माहिती दिली जाणार आहे. गावातील ध्वनीक्षेपकावरून आवाहन करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. याशिवाय मतदान केंद्रांवरील सुविधा आणि मतदारांच्या विचारांचे आदानप्रदान करण्यासाठी व्हॉट्सअॅपच्या खास ग्रुपवरून आवाहन केले जाणार आहे.

मतदान केंद्र गावापासून दूर अथवा जवळ असे कोठे असेल. त्यानुसार मतदारांना मतदान केंद्रांबाबत माहिती पोचवावी, असे निर्देश यंत्रणेला देण्यात आले. याशिवाय मतदार सहायता केंद्र, मतदान चिठ्ठ्यांचे वाटपाचे काम सुरू असल्याचेही जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune-Varanasi Train: पुणेकरांचे काशीदर्शन झाले सोपे! आता हडपसर वरून थेट वाराणसीला 'अमृत भारत' ट्रेन, PM मोदींनी दाखवला हिरवा झेंडा

Heart Health: वन बॉडी वन हार्ट : जीवनशैली, ताण, चयापचय आरोग्य आणि लवकर तपासणी एकत्रितपणे तुमचा हृदयाचा धोका कसा ठरवतात?

Latest Marathi News Live Update: कोल्हापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला कोर्टात केलं हजर

दहशतवादी संघटनेशी तुमचं कनेक्शन सापडंलय...NIA च्या नावाने डिजिटल अरेस्ट; वृद्धाची 9.5 लाखांची फसवणूक, कसं सुरक्षित राहायचं पाहा

Gold Rate Today: सोनं स्वस्त झालं की महागलं? दोन दिवसांतच भावात मोठा बदल; आजचा ताजा दर पाहा

SCROLL FOR NEXT