cow (lampi viral) sakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad; जवळा,नांदातांडा येथे आठ जनावरांना लम्पी

१७ गावांसाठी बुधवारपासून लसीकरण हाती घेण्यात येणार

सकाळ वृत्तसेवा

सोयगाव : सोयगाव तालुक्यात जवळा आणि नांदातांडा या दोन नवीन संसर्ग केंद्रात आठ जनावरांना लम्पीची बाधा झाल्याने या संसर्ग केंद्रातील पाच कि.मी.च्या त्रिज्येचा परिसरातील १७ गावांसाठी बुधवारपासून लसीकरण हाती घेण्यात येणार आहे. तालुक्यातील फर्दापूर, जवळा आणि नांदातांडा या संसर्ग केंद्रात आतापर्यंत एक हजार ९०० जनावरांना लसीकरण करण्यात आल्याची माहिती पशुधन अधिकारी डॉ. विनोद चव्हाण यांनी दिली आहे. बुधवारपासून सहा हजार दोनशे जनावरांना संसर्ग केंद्रातील १७ गावात लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी परभणी पशू महाविद्यालयाच्या चार तज्ज्ञांचे पशू वैद्यकीय पथक सोयगाव तालुक्यात ठाण मांडून आहे.

दरम्यान, लम्पी साथरोग नियंत्रणासाठी उपआयुक्त पुणे येथील मुख्यालयातील रोग अन्वेषण विभाग औंध येथील डॉ. कल्पना मुगळीकर (उप आयुक्त पशू संवर्धन), डॉ. गौरीशंकर हुलसुरे (उप आयुक्त पुणे) यांच्या पथकाची सोयगाव तालुक्यात नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आली आहे. या नियंत्रण अधिकाऱ्यांनी संसर्ग केंद्रांना भेटी देऊन बाधित जनावरांची उपचाराची खात्री करणे तसेच आवश्यकता नुसार पशू पालकांना मार्गदर्शन करावे,असे आदेशात म्हटले आहे.

तालुक्यात केवळ एक बैल लम्पी सापडला होता. संशयित जनावराचे रक्‍ताचे व गाठींचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तो पॉझिटिव्ह आला आहे. आता बैल पूर्णपणे बरा आहे. बाधित परिसराच्या पाच कि.मी. परिघामध्ये प्रतिबंध लसीकरण होत आहे. पशुपालकांनी घाबरून जाऊ नये.

- राजशेखर दडके, सहाय्यक आयुक्त, पशू विभाग

दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. लम्पी आजार रोखण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात. त्वरित उपाययोजना न झाल्यास दूग्ध व्यवसाय कोलमडून पडू शकतो. प्रादुर्भाव रोखण्यासाठी टास्क फोर्स गठित करावे.

- बाबासाहेब गायके, दूध व्यावसायिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune University : पुणे विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! भोजनगृहाची दरवाढ रद्द, दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

SCROLL FOR NEXT