मांडाखळीतील १४ सिमेंट
बंधारे गाळमुक्त करावेत
---------------
-शेतकऱ्यांची जिल्हा प्रशासनाकडे मागणी; पाणीटंचाईचे गंभीर संकट
सकाळ वृत्तसेवा
परभणी, ता. १ ः पावसाअभावी निर्माण झालेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे मांडाखळीतील शेतकरी, ग्रामस्थांसमोर पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर गावातील १४ सिमेंट बंधारे तातडीने गाळमुक्त करून त्यांची पाणी साठवण क्षमता वाढवावी अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
मांडाखळी विकास अभियानांतर्गत २०१४ ते २०१६ या कालावधीत ग्रामस्थांनी लोकसहभाग आणि श्रमदानातून गाव परिसरात १४ सिमेंट बंधाऱ्यांची उभारणी केली होती. मात्र कालांतराने या बंधाऱ्यांत मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने त्यांची साठवण क्षमता कमी झाली आहे. सध्या पावसाने दडी मारल्याने गावात तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून विहिरी, बोअरवेल आणि हातपंप पूर्णतः कोरडे पडले आहेत. परिणामी, शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. या संकटावर मात करण्यासाठी शासनाने तातडीने पुढाकार घेऊन गावातील सर्व १४ सिमेंट बंधारे गाळमुक्त करावेत. तसेच ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या अभियानांतर्गत मांडाखळी गावाचा समावेश करून जलसंधारणाची कामे प्राधान्याने हाती घ्यावीत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
यासंदर्भात कल्याणराव लोहट, नितीन लोहट, शिरीषकुमार लोहट, संजय लोहट, सचिन लोहट, दुर्गादास लोहट, शेख मोहसीन शेख हयात, शिवराणी संतराम सोनटक्के यांच्यासह मांडाखळी येथील शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे निवेदन सादर करून तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
------------
(((चौकट)))
पाणीटंचाईवर करता येईल मात
दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना पीकविमा, पिण्याचे पाणी आणि शेतीसाठी पाण्याची उपलब्धता या बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. बंधारे गाळमुक्त झाल्यास पावसाचे पाणी अधिक प्रमाणात साठवता येईल आणि भविष्यातील पाणीटंचाईवर काही प्रमाणात मात करता येईल, असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.