पेन्शनधारकांसाठी आज ‘महा-उपलब्धी’ ॲपवर विशेष कार्यशाळा
-----
धाराशिव, ता. ५ : निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना आता डिजिटल सेवांचा लाभ अगदी सुलभतेने घरबसल्या घेता येणार आहे. यासंदर्भात व्यापक मार्गदर्शन करण्यासाठी मंगळवारी (ता. सहा) सकाळी अकराला येथील जिल्हा कोषागार कार्यालयात विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्य शासनाच्या वित्त विभागाने एक जुलैपासून ‘महा-उपलब्धी’ हे आधुनिक मोबाइल ॲप कार्यान्वित केले आहे. या ॲपमुळे पेन्शनधारकांना दरवर्षी वार्षिक हयातनामा (लाइव्ह सर्टिफिकेट) सादर करणे असो किंवा आयकरविषयक फॉर्म १६ मिळविणे असो, आता कोषागार कार्यालयात फेऱ्या मारण्याची गरज उरणार नाही. या सुविधेमुळे ज्येष्ठ नागरिकांचा वेळ आणि शारीरिक त्रास दोन्ही वाचणार आहे. तंत्रज्ञानाचा सहज वापर करता यावा आणि ॲपबाबतच्या सर्व शंकांचे निरसन व्हावे, यासाठी राज्यभरात एकाच दिवशी ही आभासी कार्यशाळा होत आहे. विशेष म्हणजे, वित्त विभागाचे प्रधान सचिव ऑनलाइन पद्धतीने उपस्थित राहून थेट संवाद साधणार आहेत. जिल्ह्यातील सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी या कार्यशाळेस मोठ्या संख्येने उपस्थित राहून या महत्त्वाकांक्षी डिजिटल सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी अर्चना नरवडे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.