Ashok Chavan  
छत्रपती संभाजीनगर

आघाडी सरकारमुळे अल्पसंख्याक सुरक्षित - अशोक चव्हाण

शंभर मुलींसाठीच्या वसतिगृहाचे लातूरमध्ये लोकार्पण

सकाळ वृत्तसेवा

लातूर : गेल्या काही वर्षांत अल्पसंख्याक समाजामध्ये असुरक्षिततेची भावना आहे. राज्यातही भाजपचे सरकार असताना जाणीवपूर्वक अल्पसंख्याक समाजाच्या योजनांना खीळ घालण्यात आली. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून या समाजात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या समाजाच्या विकास योजनांवर महाविकास आघाडीचा भर आहे, असे मत सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले.

येथील पुरणमल लाहोटी तंत्रनिकेतनच्या आवारात अल्पसंख्याक समाजातील शंभर मुलींसाठीच्या वसतिगृहाचे रविवारी (ता. २७) चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजीमंत्री दिलीपराव देशमुख होते. पालकमंत्री अमित देशमुख, राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, राज्यमंत्री संजय बनसोडे, आमदार धीरज देशमुख, विक्रम काळे , अमर राजूरकर, महापौर विक्रांत गोजमगुंडे आदी उपस्थित होते.

येथे २०१५ मध्ये या वसतिगृहाचे भूमिपूजन झाले. पण भाजपच्या काळात निधीच दिला नाही. त्यामुळे काम थांबले. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर चार कोटी रुपये खर्च करून ते बांधण्यात आले आहे. लातूर, नांदेडमध्ये विकासाची स्पर्धा आहे. अशीच स्पर्धा इतर जिल्ह्यांत असल्याने मराठवाड्यासाठी हे महत्त्वाचे आहे. मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे चव्हाण म्हणाले.

एशियन बँकेच्या निधीतून लातूरचा ‘बाय पास’

लातूर शहरासाठी बाय पासचा सिमेंट रस्ता मंजूर करण्यात येईल. त्याचे काम एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून मिळणाऱ्या निधीतून करण्यात येईल, अशी माहिती चव्हाण यांनी येथे दिली. लातूर येथे नवनिर्मित सार्वजनिक बांधकाम अधीक्षक अभियंता कार्यालयाचे उद्‍घाटन आणि जिल्ह्यातील ३७ रस्ते व पुलाचे भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईची धावपळ नकोशी! मुंबई सोडून हिमाचलमध्ये शिफ्ट होणार यामी गौतम-आदित्य धर? पण नक्की कारण काय?

Iran Missile Range : इराणच्या एकाच घोषणेमुळे अमेरिकेला भीती; ब्रिटनमधून बी-१ बॉम्बर विमाने परत बोलावली

Sujay Vikhe Patil: दुष्काळात शेतकऱ्यांना मदत महत्त्वाची; जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्यामागे हाच हेतू : माजी खासदार सुजय विखे पाटील

Wide बॉलवर Six! क्रिकेटच्या इतिहासात असे विचित्र प्रथमच घडले; पाकिस्तानी गोलंदाजाने बाऊन्सर टाकला तो थेट सीमापार Video Viral

Latest Marathi News Live Update : मराठवाड्यात पदवीधर मतदार संघाच्या प्रारूप यादीमध्ये उद्धव ठाकरेंचे नाव

SCROLL FOR NEXT