Osmanabad District Bank Election sakal
छत्रपती संभाजीनगर

उस्मानाबाद जिल्हा बँक निवडणूक; अर्ज माघारीअंती आघाडीकडे पाच जागा

उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक, लढाईपूर्वीच भाजपला मात

तानाजी जाधवर

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर भाजप व राष्ट्रवादीची सत्ता होती. मात्र, सत्तेला निवडणुकीअगोदरच हादरे बसायला सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्रित मोट बांधून हे यश मिळवून भाजपला धक्का दिला आहे. पंधरा जागांपैकी पाच जागा अर्ज माघारीच्या आजच्या शेवटच्या दिवसापर्यंत महाविकास आघाडीच्या खात्यात जमा झाल्या आहेत. त्यामध्ये काँग्रेस दोन, शिवसेना दोन व राष्ट्रवादीला एक जागा मिळाली आहे. सत्तेसाठी महाविकास आघाडीला तीन जागांची गरज असून दहापैकी आठ जागांवर विजय मिळविण्याचे भाजपपुढे कडवे आव्हान असणार आहे.

जिल्हा बँक निवडणूक अत्यंत वेगळ्या समीकरणामुळे चर्चेत येणार हे स्पष्ट झाले होते. त्याचप्रकारे ही निवडणूक आता एकतर्फी होण्याच्या स्थितीत आल्याचे दिसून येत आहे. भाजप आता उसने बळ आणून लढत असले तरी त्यांना पंधरा जागांवर उमेदवार सुद्धा मिळाले नसल्याचे वास्तव समोर आले आहे. भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे अनेक ठिकाणी असलेल्या सत्ता हातात ठेवण्याचे त्यांच्यापुढे मोठ आव्हान होते.

गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीत असताना आमदार पाटील व भाजपने आघाडी करून पंधरापैकी नऊ जागा जिंकल्या होत्या. त्यात राष्ट्रवादीच्या आठ जागा होत्या व भाजपची एक जागा येऊनसुद्धा त्यांना उपाध्यक्षपद दिले होते. आठपैकी सात संचालक भाजपमध्ये गेल्यावर त्यांच्याबरोबर राहिले. बँकेचे अध्यक्ष सुरेश बिराजदार राष्ट्रवादीतच राहिल्याने सत्तास्थानी हाच पक्ष राहिला होता. भाजपमध्ये गेल्यानंतर आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखाली पॅनेल तयार झाले असले तरी दहाच जागांवर ते निवडणूक लढवित आहेत.

दुसऱ्या बाजूला शिवसेनेमध्ये अंतर्गत गटबाजीचा धोका व्यक्त करण्यात आला असला तरी तिथेही दोन्ही गट महाविकास आघाडीबरोबर राहिल्याचे दिसून येत आहे. आघाडीच्या पक्षांनी प्रत्येकी पाच जागा घेऊन समसमान वाटप केल्याचे चित्र आहे. त्यापैकी पाच जागा तर आताच बिनविरोध आल्या आहेत. त्यात तुळजापूर सोसायटी मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराने माघार घेतल्याचे दिसून आले. जिल्ह्याच्या राजकारणात ही महत्त्वाची व समीकरण बदलणारी निवडणूक मानली जात आहे. येऊ घातलेल्या नगरपालिका, जिल्हा परिषद-पंचायत समितीची रंगीत तालीम असल्याने या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT