छत्रपती संभाजीनगर

निधी अभावी महाडायलिसीसची मोफत सेवा बंद : रुग्णांची राज्यभर हेळसांड

CD
निधीअभावी महाडायलिसीस मोफत सेवा तात्पुरती बंद -------- गरजू रुग्ण, कुटुंबीयांत संताप पूर्णा, ता. १२ (बातमीदार): राज्य शासनाकडून निधी प्राप्त न झाल्यामुळे महाडायलिसिस अंतर्गत दिल्या जाणारी मोफत डायलिसिस सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे. यामुळे डायलिसीसची नियमित गरज असलेल्या रुग्णांची हेळसांड होणार आहे. याबाबत गरजू रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात महाडायलिसिस प्रकल्प गेल्या दोन वर्षांपासून कार्यरत असून, किडनी निकामी झालेल्या लाभार्थ्यांना, विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांना, या प्रकल्पांतर्गत मोफत डायलिसीस सेवा दिली जात आहे. या प्रकल्पांतर्गत राज्यात एकूण १०८ महाडायलिसीस केंद्रे कार्यरत आहेत. त्याप्रमाणे येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्ण उपचार घेत होते. आता त्यांना एक दिवसाआड नांदेड येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी न्यावे लागत आहे. सद्यःस्थितीत प्रकल्पासाठी आवश्यक निधी प्राप्त न झाल्यामुळे, मोठ्या प्रमाणात देयके थकीत असल्यामुळे प्रकल्प सध्या गंभीर आर्थिक अडचणीत सापडला आहे. आर्थिक अडचणी असूनही लाभार्थ्यांचे उपचार खंडित होऊ नयेत यासाठी आतापर्यंत मोफत डायलिसीस सेवा सुरू ठेवण्यात आली होती. मात्र, निधी मिळण्यास सतत होत असलेला विलंब आणि पुढील खर्च करणे शक्य नसल्यामुळे महाडायलिसीस प्रकल्प व्यवस्थापनाला महाडायलिसीस केंद्रांचे कामकाज तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे असे त्यांनी म्हटले आहे. (((चौकट))) डायलिसीस उपचार हे अत्यंत महत्त्वाचे असून त्यात खंड पडल्यास आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सर्व लाभार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांची काळजी सरकारने घेत पर्याय शोधून डायलिसीसची व्यवस्था करावी. -देवराव खंदारे, माजी नगरसेवक, पूर्णा --------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईला उडवणाऱ्या धमक्यांचे सत्र सुरूच, पुन्हा बॉम्बची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर

Novaya Gazeta: ६ पत्रकारांची हत्या, ३३ वर्षांचा संघर्ष; रशियातील शेवटचे मोठे स्वतंत्र वृत्तपत्रही बंद

Latest Marathi News Live Update : धक्कादायक! राज्यात अवघ्या ७ महिन्यांत रस्ते अपघातात ९,१९५ जणांचा मृत्यू

Pune Cyber Crime: बनावट अटक वॉरंट, व्हिडिओ कॉल आणि धमक्या; पुण्यातील वृद्ध महिलेची 32 लाखांची फसवणूक

विनयभंगानंतर तरुणीला लोकलखाली ढकलल्याचा आरोप; नायगाव स्थानकातील धक्कादायक घटना|Naigaon | Mumbai news

SCROLL FOR NEXT