MARD Doctor Strike : ‘मार्ड’च्या निवासी डॉक्टरांचा संप सुरूच Sakal news
छत्रपती संभाजीनगर

MARD Doctor Strike : ‘मार्ड’च्या निवासी डॉक्टरांचा संप सुरूच

मागण्या मान्य न झाल्यास संपात अत्यावश्‍यक सेवाही

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : ‘मार्ड’चे डॉक्टर्स शुक्रवार (ता. एक) पासून राज्यभर संपावर आहेत. औरंगाबादेतील घाटी रुग्णालयातही तीनशे निवासी डॉक्टर संपावर आहेत. या संपाचा आज दुसरा दिवस असून आज या डॉक्टरांनी रुग्णालय परिसरात मोर्चा काढला आणि मागण्यांसंदर्भात घोषणा दिल्या.

वैद्यकीय शुल्क माफ करावे, वसतिगृहातील समस्या दूर करावी, डॉक्टरांना रुग्णसेवा करण्यासाठी घाटीत चांगले वातावरण तयार करावे. मानधनात वाढ करावी आदी मागण्यांसाठी संपावर असलेल्या घाटीतील निवासी डॉक्टरांनी दुसऱ्या दिवशीही वैद्यकीय अधीक्षक कार्यालय ते मेडिसीन इमारतीपर्यंत मोर्चा काढला. यावेळी प्रशासन व राज्य शासनांच्या धोरणांविरुद्धही घोषणाबाजी करण्यात आली. मेडिसीन इमारतीसमोर मोर्चा आल्यानंतर छोटेखानी सभा घेण्यात आली.

स्थानिक मार्डचे अध्यक्ष डॉ. अक्षय क्षीरसागर, डॉ. ऋषिकेश फडणीस, डॉ. आबासाहेब तिडके, डॉ. कांचन देवडे, डॉ. योगिता देवरे, डॉ. दीप्ती आनंद आणि डॉ. सूचित सूर्यवंशी यांनी मोर्चेकरी डॉक्टरांना संबोधले. यावेळी डॉ. अमृता माने, डॉ. ऋषिकेश गव्हाणे, डॉ. उमेश येवले, डॉ. सौरभ डिकोळे, डॉ. मल्लिका अग्रवाल, डॉ. काव्या भट, डॉ. अभय कावेडिया आदींची उपस्थिती होती. दरम्यान, मागण्या पूर्ण न झाल्यास अत्यावश्यक सेवा व शस्त्रक्रियासंबंधित सेवा बंद करण्याचा इशाराही मार्डच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

बेमुदत संप मार्डच्या मध्यवर्ती संघटनेच्या मार्गदर्शनाखाली सुरूच राहणार आहे. संपात घाटी रुग्णालयातील तीनशे निवासी डॉक्टर सहभागी झाले आहेत.

-डॉ. अक्षय क्षीरसागर, स्थानिक अध्यक्ष, ‘मार्ड’संघटना.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Census: जनगणनेसाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याला पुण्यात शिवीगाळ, मुलाला मारहाण; ⁠कर्मचारी संघटनेचा इशारा

NEET Paper Leak: नीट पेपर फुटीच्या प्रकरणात पंतप्रधानांनी घातलं लक्ष; 'पीएमओ'तील अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, आता हवाई दलाची घेणार मदत...

Ratnagiri Weather : रत्नागिरीत पुढील 3 दिवस कसं असेल हवामान? समुद्र खवळल्याने मच्छीमारांनी नौका घेतल्या किनाऱ्यावर, दिवसभर ढगाळ वातावरण

Property Tax : मिळकतकर वसुलीने गाठला १००० कोटीचा टप्पा

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT