छत्रपती संभाजीनगर

सकाळ’च्या दणक्यानंतर महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे सहायक व्यवस्थापक निलंबित :

CD
पीक कर्जवाटपातील दिरंगाई भोवली महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या कळंब शाखेतील सहायक व्यवस्थापक निलंबित कळंब, ता. ३० (बातमीदार) : दुष्काळाच्या झळांनी होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी बँकेचे उंबरठे झिजवावे लागत असताना कळंब येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत शाखाधिकारी नसल्याचे कारण पुढे करून कर्जवाटप रखडले होते. शेतकऱ्यांची ही अडवणूक ‘सकाळ’ने सातत्याने मांडल्याने बँक प्रशासनाने दखल घेतली. प्रादेशिक व्यवस्थापक पद्मसिंह पाटील यांनी बुधवारी (ता. २८) शाखेला भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. पीक कर्जवाटपाचे अधिकार सहायक व्यवस्थापकांना देण्यात आले; तसेच कर्जवाटपात अडथळे आणल्याच्या कारणावरून सहायक व्यवस्थापक रूपेश झांबरकर यांना गुरुवारी (ता. २९) निलंबित करण्यात आले. शाखाधिकाऱ्यांची बदली झाल्यानंतर कळंब शाखेतील पीक कर्जवाटपाचा प्रश्न गंभीर बनला होता. कर्जमाफीचा लाभ मिळाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी नव्याने पीक कर्ज मिळण्यासाठी बँकेकडे प्रस्ताव दाखल केले होते. मात्र, शाखाधिकारी नसल्याचे कारण सांगत कर्जवाटप रखडल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली होती. इरकूर, आडसुळवाडी, भोगजीसह परिसरातील शेतकरी कर्जासाठी वारंवार बँकेत चकरा मारत होते. दुष्काळ आणि शेतीच्या वाढत्या खर्चामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना वेळेत कर्ज मिळत नसल्याने त्यांच्या संकटात भर पडली होती. याबाबतचे वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध होताच तत्काळ दखल घेत प्रादेशिक व्यवस्थापकांनी शाखेला भेट देऊन संबंधित कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली. शाखाधिकारी नसल्यामुळे कामकाज थांबू नये, यासाठी सहायक व्यवस्थापकांना पीक कर्जवाटपाचे अधिकार देण्यात आले आहेत. मात्र, अधिकार दिल्यानंतरही कर्जवाटपात अडथळे आल्याने संबंधित कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. .................... ((चौकट)) महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे कर्मचारी निलंबित झाल्यानंतर उपलब्ध बँक कर्मचाऱ्यावर कामाचा ताण वाढला असून शेतकऱ्यांना पीक कर्ज तातडीने मिळण्यासाठी अडथळे निर्माण होत आहेत. बँकेच्या वरिष्ठ व्यवस्थापणाने खामसवाडी शाखेचे सहायक व्यवस्थापक राघव गौड यांना पीक कर्ज वाटपाचे तात्पुरते अधिकारी दिले; मात्र गौड यांची कळंब शाखेला कायस्वरूपी नेमणूक करावी, अशी मागणी शेतकरी दत्ता आडसूळ, राजेश गंभीरे, एकनाथ भोंग आदी शेतकऱ्यांनी केली आहे.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचं मोठं पाऊल! मुदत संपलेल्या अन्नपदार्थांच्या पुनर्विक्रीबाबत नवे नियम लागू

BJP PM Candidate Announcement for 2029 : २०२९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा PM पदाचा चेहरा ठरला! बैठकीत अमित शाहांनी अचानक जाहीर केलं 'हे' नाव; राजकीय वर्तुळात मोठी खळबळ!

China EV Crisis: चिनी इलेक्ट्रिक कारचा जगात डंका, पण मायदेशात ठणठणाट! चीनच्या ईव्ही उद्योगाचं गणित कसं बिघडलं?

IND vs NZ, 4th T20I: टीम इंडियाचं नेमकं काय चुकलं? कर्णधार श्रेयस अय्यरने स्पष्टच सांगिलतं; फिलिप्सचंही केलं भरभरून कौतुक

Marathi News Live Updates : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत रक्षा खडसेंना स्वकीयांचंच आव्हान; आमदार चंद्रकांत पाटलांचा थेट इशारा!

SCROLL FOR NEXT