छत्रपती संभाजीनगर

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेच्या ऑनलाईन प्रवेशिकेसाठी २५ सप्टेंबरपर्यंत मुदत, लातूर जिल्ह्यातील नाट्य संस्थांना सहभागी होण्याचे आवाहन

CD
राज्य नाट्य स्पर्धेसाठी मागविल्या २५ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन प्रवेशिका --- लातूर, ता. २ : शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी, हिंदी, संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा व दिव्यांग बालनाट्य स्पर्धांसाठी नाट्य संस्थांकडून २५ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन पद्धतीने प्रवेशिका मागविण्यात येत असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी दिली. दरम्यान, लातूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त नाट्य संस्थांनी महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी केले. महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी डिसेंबरपासून विविध १० केंद्रांवर तर हौशी हिंदी, संगीत व संस्कृत नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी प्रत्येकी एका केंद्रावर डिसेंबरपासून आयोजित करण्यात येणार आहे. नोंदणीकृत हौशी नाट्य संस्थांना तसेच गतवर्षी राज्य नाटय स्पर्धेत सहभागी झालेल्या नाट्य संस्थांना स्पर्धेसाठी विहित नमुन्यातील प्रवेशिका, नियम संचालनालयाच्या https://mahanatyaspardha.com या संकेतस्थळावर उपलब्ध होतील. स्पर्धेसाठी संस्थेची निवड झाल्यानंतर संस्थेने शासनाने निश्चित केलेल्या केंद्रावर व दिलेल्या तारखेस प्रयोग सादर केला नाही, तर त्यांची प्रवेशिकेसोबत भरलेली अनामत रक्कम शासकीय कोषागारात जमा करण्यात येईल. नाट्यस्पर्धेकरिता संस्थांना शासन नियम बंधनकारक राहतील. नियमांचे उल्लंघन केल्यास संस्थेला अपात्र ठरविण्यात येईल, असेही संचालनालयाने कळविले आहे. -----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation : सकल मराठा समाजाकडून लातूर जिल्हा बंदची हाक; मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा

Maratha Reservation : पाण्याच्या टाकीवर चढून पेट्रोलची बाटली हातात घेत उपोषण; मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन

Lohgaon News : संसाराची जबाबदारी सांभाळत जिद्दीने अभ्यास; धुपखेड्याच्या सुनेची नागपूर जिल्हा परिषदेत शिक्षिका म्हणून निवड

Marathi News Live Updates : शिवसेना पक्षाच्या वादावर सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद नेमका काय ?

'तो फोटो चोरला अन् आईने खूप मारलं' जितेंद्र जोशी बालपणीची आठवण सांगताना म्हणाले...'मामाने पट्ट्यानं आणि आईनं चपलेनं...'

SCROLL FOR NEXT