छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजी नगर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा मनसेची मागणी.

CD
ता.२२/९/२६, गंगापूर ता.बातमीदार :- छत्रपती संभाजीनगर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा, अन्यथा तीव्र आंदोलन मनसेचा सरकारला इशारा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामीण भागात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले आहे. पावसाच्या दीर्घ खंडामुळे शेतकऱ्यांच्या हाताशी आलेली पिके पूर्णपणे करपून गेली असून, पाणी आणि चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्हा तात्काळ ''दुष्काळग्रस्त'' जाहीर करावा, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रस्ते, साधन-सुविधा व आस्थापना विभागाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना मंगळवार (ता.२२) रोजी निवेदन देण्यात आले. जिल्हा संघटक अशोक पवार पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सोपवण्यात आले. शासनाने केवळ काही विशिष्ट तालुकेच दुष्काळग्रस्त घोषित केले असले, तरी जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यांमध्येही परिस्थिती अत्यंत गंभीर आणि चिंताजनक असल्याचे मनसेने निदर्शनास आणून दिले. यावेळी त्यांनी केलेल्या प्रमुख मागण्या संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा.बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी भरीव मदत थेट जमा करावी.शेतकऱ्यांना सरसकट संपूर्ण कर्जमाफी द्यावी.पीक विम्याची भरपाई कोणतीही अट न ठेवता तात्काळ वितरित करावी. ग्रामीण भागात टँकर, चारा छावण्या आणि रोहयोची कामे तत्काळ सुरू करावीत. शेतीची वीज जोडणी तोडणे आणि महसूल वसुलीची कारवाई त्वरित स्थगित करावी. या वेळी मनसेचे राज्य उपाध्यक्ष बाबासाहेब अवघडे, उपजिल्हा संघटक अशोक कराळे, तालुका सचिव बाळासाहेब बोजवारे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास "रोज एका तालुक्यात तहसील कार्यालयावर घंटा बजाव, ढोल बजाव आणि शंखनाद" करून तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा थेट इशारा अशोक पवार यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : राज्यात परतीच्या पावसाचा जोर वाढणार; विदर्भ-मराठवाड्यासह २९ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Chana Moong Dal Chilla: हेल्दी नाश्ता म्हणजे बेचव नाही! असा बनवा चणे-मूग चिला! खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल

आजचे राशिभविष्य - 23 सप्टेंबर 2026

Azamgarh Hostage Crisis : आझमगढ हादरलं! आधी पत्नी अन् दोन पुजाऱ्यांची हत्या, मग मुलावर झाडली गोळी; ८ तासांच्या ऑपरेशननंतर आरोपीचा एन्काउंटर

Sangli ACB Trap : भूमी अभिलेखमधील दोघे लाच घेताना जाळ्यात; ईश्‍वरपुरात रचला सापळा, प्रॉपर्टी कार्डावर क्षेत्र दुरुस्तीसाठी घेतले 50 हजार

SCROLL FOR NEXT