e-waste processing centers 
छत्रपती संभाजीनगर

महाराष्ट्रात सर्वाधिक ई-कचरा प्रक्रिया केंद्रे

एका लाख टनापेक्षा जास्त क्षमता; देशात फक्त ४७२ केंद्रे

- शेखलाल शेख

औरंगाबाद : तंत्रज्ञानाचा वापर देशात वाढत असला तरी ई-कचऱ्याची समस्या गंभीर होत चालली आहे. दुसरीकडे त्यावर प्रक्रिया, फेरवापर करणाऱ्या अधिकृत केंद्रांची संख्या पुरेशी नाही. देशात फक्त ४७२ अधिकृत फेरवापर-विघटन करणाऱ्या केंद्रांची संख्या असून दरवर्षी १४ लाख २६ हजार ६८५.२० टन एवढीच प्रक्रिया करण्याची क्षमता या सर्व केंद्रांची आहे. यात देशात सर्वाधिक ११६ केंद्रे महाराष्ट्रात असून त्याची प्रक्रिया करण्याची क्षमता एक लाख ६ हजार २८० टन एवढी आहे.

ई-कचऱ्यामध्ये इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अशा २१ प्रकारच्या उपकरणांचा समावेश होतो. २०१९-२० या वर्षाचा विचार केला तर देशभरात दहा लाख १४ हजार ९६१.२१ टन एवढा इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स कचरा निघाला होता. त्या तुलनेत त्यावर प्रक्रिया होण्याचे प्रमाण फक्त २२.७ टक्के होते. हा नोंदणीकृत ई-कचरा आहे तर दुसरीकडे नोंदणीकृत नसलेल्या भंगारात विक्री होणाऱ्या ई-कचऱ्याची समस्या वाढती आहे.

ई-कचरा (व्यवस्थापन) नियम २०१६ नुसार देशात २१ प्रकारची इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे ई-कचऱ्यात मोडतात. संगणक आणि मॉनिटर, माऊस, की-बोर्ड, मोबाईल फोन, त्यांचे खराब झालेले सुटे भाग, दूरचित्रवाणीसंच व त्यांचे सुटे भाग, इलेक्ट्रॉनिक खेळणी, निकामी सेल, रिमोट, व्हीसीआर, सीडी प्लेयर, जुने प्रिंटर, वायर, यंत्रे अशा ई-कचऱ्याती समस्या गंभीर आहे.

ई-कचऱ्यावर प्रक्रिया, पुनर्वापर

वर्ष - ई कचरा (लाख टनात) - पुनर्वापर (टनात) - टक्केवारी

२०१७-१८ = ७,०८, ४४५ = ६९, ४१३ = ९.७९

२०१८-१९ = ७, ७१,२१५ = १,६४, ६६३ = २१.३५

२०१९-२० = १०, १४,९६१ = २,२२, ४३६ = २२.७

निवडक राज्यनिहाय अधिकृत विघटन केंद्रे

  • उत्तर प्रदेश 89

  • उत्तराखंड 6

  • हरियाना 43

  • तमिळनाडू 32

  • तेलंगण 18

  • महाराष्ट्र 116

  • राजस्थान 24

  • आंध प्रदेश 8

  • गुजरात 33

  • कर्नाटक 71

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palkhi Route Development : संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील कामाला गती

Pune Traffic: वडगाव घेनंद घाटात अवजड वाहन बंद; भर पावसात पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवली.

Tomato Rate : नारायणगावात टोमॅटोच्या भावात घसरण; उपबाजारात हंगामातील उच्चांकी ६० हजार टोमॅटो क्रेटची आवक

CET Exam Result : सीईटी परीक्षेत बारामतीचा डंका, दोन विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

SCROLL FOR NEXT