छत्रपती संभाजीनगर

महावितरण देणार वीजचोरांना शॉक

CD
महावितरण देणार वीजचोरांना शॉक ---- नाव व पत्ता जाहीर करणार; सामाजिक वचक बसविण्यासाठी विशेष मोहीम ------ बीड, ता. १६ : दरमहा वेळेवर आणि प्रामाणिकपणे वीजबिल भरूनही लोडशेडिंगचा नाहक फटका सहन करावा लागणाऱ्या बीड जिल्ह्यातील वीज ग्राहकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. वीजचोरीमुळे महावितरणला होणारा प्रचंड आर्थिक घाटा आणि वितरण हानी शेवटी वीज दरवाढीच्या रूपात प्रामाणिक ग्राहकांच्या माथी मारली जाते. या प्रकाराला आळा घालण्यासाठी आता महावितरण प्रशासनाने कडक पाऊल उचलले आहे. यापुढे वीजचोरी करताना आढळणाऱ्यांचे नाव आणि पत्ता थेट सार्वजनिक करून त्यांच्या इज्जतीचा पंचनामा करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. जिल्ह्यात वर्षभरात महावितरणच्या भरारी पथकांनी छापे मारून वीजचोरीची शेकडो प्रकरणे उघडकीस आणली. तरीही स्मार्ट मीटर आणि हायटेक तंत्रज्ञानाला चकवा देत वीजचोरीचे सत्र सुरूच आहे. त्यामुळे केवळ दंडात्मक किंवा कायदेशीर कारवाई न करता, वीजचोरांवर सामाजिक वचक बसावा यासाठी महावितरणने ही विशेष मोहीम आखली आहे. ​या मोहिमेअंतर्गत वीजचोरी करताना पकडले गेल्यास संबंधिताचे नाव आणि पूर्ण पत्ता वृत्तपत्रे, समाजमाध्यमे आणि सार्वजनिक ठिकाणी जाहीर केला जाणार आहे. महावितरणच्या दाव्यानुसार, अनधिकृत वीजजोडण्या व आकडे टाकून केली जाणाऱ्या वीजचोरीमुळे वितरण हानीचे प्रमाण प्रचंड वाढते. परिणामी, महावितरणवर मोठा आर्थिक भार पडतो. त्याचा नाहक त्रास प्रामाणिक ग्राहकांना सोसावा लागतो. हे रोखण्यासाठी प्रशासनाने आता वीजचोरीप्रकरणी थेट गुन्हे दाखल करून वीज कायदा २००३ नुसार दंडात्मक व दंडासह अटकेची कारवाई केली जाईल. ---- नियमित बिल भरणाऱ्या ग्राहकांचा विशेष सन्मान दरमहा वेळेवर आणि प्रामाणिकपणे बिल भरणाऱ्या ग्राहकांचा महावितरणकडून विशेष सन्मान केला जाणार आहे. एकीकडे बीड जिल्ह्यात विविध वर्गवारीतील ग्राहकांकडे लाखोंची थकबाकी साचली आहे, तर दुसरीकडे गुपचूप वीज वापरणाऱ्यांचे प्रमाणही मोठे आहे. महावितरणच्या पथकांकडून प्रत्येक वीज जोडणीवर आता बारीक लक्ष ठेवले जात आहे. ​ग्राहकांनी तत्काळ अधिकृत वीजजोडणी घेऊनच विजेचा वापर करावा, अन्यथा इज्जतीच्या पंचनाम्यासह कठोर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट व कडक इशारा महावितरण प्रशासनाने दिला आहे. --- ((कोट)) वीजचोरीमुळे महावितरणचे मोठे नुकसान होतेच, शिवाय याचा अप्रत्यक्ष फटका प्रामाणिक ग्राहकांना बसतो. त्यामुळे जिल्ह्यात वीजचोरीविरोधात विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. यापुढे अनधिकृत वीज वापरणाऱ्यांवर कायदेशीर गुन्हे दाखल करण्यासोबतच त्यांचे नाव व पत्ता सार्वजनिक करून कठोर कारवाई केली जाईल. ग्राहकांनी कायदेशीर जोडणी घेऊन महावितरणला सहकार्य करावे. - प्रेमसिंग राजपूत, मुख्य कार्यकारी अभियंता, महावितरण, बीड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI ची मोठी घोषणा! WPL 2027 च्या तारखा जाहीर; २८ ऑक्टोबरला ऑक्शन, फ्रँचायझीला या महिन्याची दिलीय डेडलाईन, नेमकं काय?

Road Development : धनंजय मुंडेंच्या मागणीला यश! लोखंडी सावरगाव-बर्दापूर फाटा रस्ता होणार चौपदरी; १०४.४९ कोटींच्या कामाची निविदा प्रसिद्ध

Saudi Arabia Drone Attack : मुस्लिमांसाठी पवित्र मक्कावर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न ; सौदीने हवेतच केले नष्ट, भारताने व्यक्त केली चिंता

Gangapur News : शिक्षकांची बंद केलेली वेतनवाढ आदेश त्वरित रद्द करावा; आमदार सतीश चव्हाण यांची मागणी

Nagpur News : सहकाराचा गाडा रुळावरून घसरला! दहा वर्षांत आठ सहकारी पतसंस्था डबघाईस, २२ संस्था अवसायनात; मौद्यात सहकार संकटात

SCROLL FOR NEXT