छत्रपती संभाजीनगर

‘मुक्त’च्या उत्तरपत्रिकांची भलत्यांकडूनच तपासणी

CD
‘मुक्त’च्या १९ हजार उत्तरपत्रिकांची अनधिकृत तपासणी --- लासूर स्टेशनच्या छत्रपती शाहू महाविद्यालयातील प्रकार, प्राचार्यांसह ४८ जणांवर गुन्हा --- लासूर स्टेशन, (ता. गंगापूर) ता. १६ : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या (नाशिक) १९ हजार २३१ उत्तरपत्रिका संबंधित विषयांचे तज्ज्ञ नसलेल्या आणि अनधिकृत शिक्षकांकडून तपासून घेत विद्यापीठासह विद्यार्थ्यांची फसवणूक केली. लासूर स्टेशन (ता. गंगापूर) येथील छत्रपती शाहू कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या परीक्षा मूल्यमापन केंद्रात हा प्रकार घडला. यात विद्यापीठाकडून २ लाख ७६ हजार रुपयांचे मानधन लाटले. या प्रकरणी शिल्लेगाव पोलिस ठाण्यात महाविद्यालयाचे प्राचार्य, कॅप सेंटर संचालकांसह ४८ जणांविरुद्ध रविवारी (ता. १५) रात्री उशिरा गुन्हा नोंद झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, मुक्त विद्यापीठाचे उपकुलसचिव (परीक्षा युनिट ३ व केंद्रीय मूल्यमापन कक्ष, नाशिक) मनोज नारायण घंटे (वय ५३) यांनी तक्रार दिली. हा सर्व गैरप्रकार गतवर्षी २०२५ मध्ये ९ जून ते ४ जुलै या कालावधीत घडला. विद्यापीठाने छत्रपती शाहू महाविद्यालयातील उत्तरपत्रिका तपासणी केंद्रावर काही अधिकृत प्राध्यापकांची परीक्षक म्हणून नियुक्ती केली होती. मात्र, संशयितांनी आपापसांत संगनमत करून अधिकृत प्राध्यापकांचा केवळ बायोमेट्रिक अंगठा (थंब इम्प्रेशन) घेतला आणि उत्तरपत्रिका तपासण्याची ऑनलाइन लिंक आणि साइट उघडली. प्रत्यक्षात अधिकृत प्राध्यापक केंद्रावर उपस्थित नसतानाही, तेच पेपर तपासत असल्याचा भास निर्माण करणारे बनावट आयडी तयार करण्यात आले. या माध्यमातून ज्यांना संबंधित विषयाचे ज्ञान नाही आणि जे विद्यापीठाकडून अधिकृत नाहीत, अशा दुय्यम आणि अनधिकृत शिक्षकांकडून १९ हजार २३१ उत्तरपत्रिका तपासून घेतल्या. यासाठी विद्यापीठाकडून २ लाख ७६ हजार ४१८ रुपयांचे मानधन उकळले. त्यातील काही रक्कम अनधिकृत शिक्षकांना देऊन उर्वरित रकमेचा अपहार करत विद्यापीठाच्या नियमांचे व कायद्याचे गंभीर उल्लंघन करण्यात आले आहे. याप्रकरणी कलम १९८, ३१८(४), ३१९(२), ३३६(२), १९९, ३(५), ६१(२), १० आणि ३४०(२) अन्वये गुन्हा नोंद झाला. तापास पोलिस उपनिरीक्षक गणेश काळे करीत आहेत. -- यांच्यावर नोंद झाला गुन्हा प्राचार्य डॉ. संदीप राजाभाऊ धिरडे, प्रा. डॉ. मधुकर साठे (कॅप सेंटर संचालक), दादासाहेब कऱ्हाळे (तांत्रिक सहायक), अंकुश गंगाराम पडाळे, प्रा. विशाल अशोकराव चपटे, ज्योती भरतराव चव्हाण, डॉ. ए. एन. मस्के, डॉ. अविनाश अंकुशराव भीमराव, विश्वनाथ कोंडिबा बोबडे, डॉ. डी. एम. पंडिलवाड, डॉ. एच. एस. सातपुते, डॉ. रितांजली श्रीराम जाधव, डॉ. एन. जी. साळुंके, डॉ. पी. आर. मिसाळ, डॉ. एस. डी. वागवे, डॉ. एल. एस. दुग्गमवार, डॉ. व्ही. के. चव्हाण, डॉ. व्ही. एन. बागुल, डॉ. व्ही. एस. फुलारी, डॉ. वाय. ए. पाटील, डॉ. राजाभाऊ नारायणराव करपे, डॉ. एस. बी. सोलापुरे, दत्ता जनार्दन येरमुले, अशोक नागनाथ गायके, वसंतकुमार गणपत माळी, प्रा. बाळासाहेब वसंतराव राठोड, राजीव बबनराव मोहिते, निर्मला नारायण सिरसाठ, राजेश्वर माणिकराव विभूते, प्रा. कृष्णा काशिनाथ गवळी, कावेरी श्रीमंतराव थोरे, डॉ. एस. बी. मनल, डॉ. आर. एस. पांचाळ, ऋषिकेश दिलीप बनकर, जितेंद्र चव्हाण, पंडित चव्हाण, ज्ञानेश्वर धोत्रे, पी. एम. तुपे, प्रा. श्रुती सुधाकर चव्हाण, डॉ. बी. व्ही. वाहटुळे, डॉ. आर. एम. सरवदे, वंदना यादवराव कांबळे, प्रा. प्रमोद उत्तमराव भास्कर, गोकुळ राजेंद्र पवार, सुयोग चव्हाण, रामेश्वर तुळशीराम करपे, जयंत माणिकराव पठाडे, डॉ. संतोष जगन्नाथ जाधव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pimpri Chinchwad RTO : पिंपरी चिंचवड आरटीओच्या रडार यंत्रणेमुळे सात महिन्यांत १० हजार ७१३ वाहनचालकांवर कारवाई; ८९ कोटींहून अधिक दंड आकारला

Congress: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसकडून स्क्रीनिंग कमिट्या जाहीर; उत्तर प्रदेशची जबाबदारी 'या' नेत्याकडे

MLA Shankar Mandekar : मुळशी तालुक्यात नव्याने पंचनामे करण्याचे शासनाचे आदेश; आमदार मांडेकर यांच्या पाठपुराव्याला यश

Kalbhor Nagar : काळभोरनगरमधील सूर्योदय कॉम्प्लेक्स परिसरात दोन वर्षांपासून सिमेंटचा धुरळा आणि रासायनिक दुर्गंधीचा त्रास; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

Pune Airport : प्रवाशांची वाट पाहण्यासाठी टर्मिनलवर थांबणाऱ्या वाहनांवर विमानतळ प्रशासनाची नजर; एनपीआर कॅमेऱ्यांद्वारे वेळेची नोंद होणार

SCROLL FOR NEXT