जिल्ह्यात १६८ कोटींची अग्रिम मदत
-प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या खात्यात पाच हजार रुपये जमा
सकाळ वृत्तसेवा
परभणी, ता. ९ ः राज्य शासनाच्या दिवाळी अग्रिम मदत योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ३ लाख ३६ हजार ३८० शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत १६८ कोटी १९ लाख रुपयांची मदत जमा करण्यात आली आहे. प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पाच हजार रुपयांप्रमाणे ही आर्थिक मदत देण्यात आली आहे. त्यामुळे दुष्काळाच्या संकटाचा सामना करणाऱ्या जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.
राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक आधार मिळावा, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये अग्रिम मदत देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार महसूल, मदत व पुनर्वसन आणि कृषी विभागाच्या माध्यमातून मदत वितरणाची प्रक्रिया राबविण्यात आली. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत जमा करण्यात आली. पाच नोव्हेंबरअखेर जिल्ह्यातील ३ लाख ३६ हजार ३८० शेतकऱ्यांना एकूण १६८ कोटी १९ लाख रुपयांचे वितरण पूर्ण झाले आहे. राज्यातील छत्रपती संभाजीनगर विभागात झालेल्या मदत वितरणातही जिल्ह्याचा समावेश आहे. काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यांशी संबंधित तांत्रिक अडचणी, खाते क्रमांकातील त्रुटी, अन्य कारणांमुळे मदतीची रक्कम जमा होण्यास विलंब झाला आहे. अशा शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून कार्यवाही सुरू आहे.
((चौकट)))
वंचितांनाही मिळणार मदत
जिल्ह्यातील एकही पात्र शेतकरी अग्रिम मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत. तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्याही बँक खात्यांत पाच हजार रुपयांची मदत जमा करण्यात येणार असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी स्पष्ट केले.
-----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.