maharashtra farmer in debt agri loan heavy rain drought chhatrapati sambhajinagar sakal
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar : कृषी कर्जाच्या ओझ्याखाली दबला बळिराजा

दीड लाख कोटी थकीत : अतिवृष्टी, दुष्काळ, गारपिटीने परतफेड अवघड

- शेखलाल शेख

छत्रपती संभाजीनगर : अतिवृष्टी, ओला-कोरडा दुष्काळ, कधी गारपीट तर कधी सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांची हातून पिके जात असल्याने खरीप आणि रब्बी हंगामात घेतलेले पीककर्ज फेडणे जिकिरीचे झाले आहे. त्यामुळे देशासह महाराष्ट्रातील शेतकरी पीककर्जाच्या ओझ्याखाली दबत चालले आहेत.

महाराष्ट्रात ३० जून २०२३ पर्यंत शेतकऱ्यांनी विविध बँकांकडून घेतलेले एकूण १ लाख ६१ हजार ४७१ कोटी ९ हजार रुपयांचे पीककर्ज थकीत आहे. यामध्ये एकूण खात्यांची संख्या १० कोटी १९ लाख ४ हजार ६४६ एवढी आहे. यात व्यापारी, सहकारी आणि क्षेत्रीय ग्रामीण बँकांनी हे कर्ज दिलेले आहे. आता राज्यात दुष्काळी स्थिती असल्याने हे कर्ज कसे फेडावे, असा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर आहे.

बहुतांश शेतकरी खरीप आणि रब्बी हंगामात पीककर्ज काढून पेरणी, लागवड करत असतो. मात्र यावर्षी दुष्काळी स्थिती असल्याने खरिपासाठी घेतलेल्या पीककर्जाची माती होण्याची शक्यता आहे.

जवळ असलेले सर्व पैसे शेतीत गुंतविल्याने या वर्षी शेतकरी कर्जबाजारी राहण्याची शक्यता आहे. फळबागा डोळ्यांसमोर उद्ध्वस्त होण्याची स्थिती आहे. कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यांना जमीन विकावी लागेल किंवा सावकारांकडून कर्ज काढण्याची वेळ आली आहे.

राज्यातील स्थिती

महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या डोक्यावर १ लाख ६१ हजार ४७१ कोटी रुपयांचे पीककर्ज आहे. त्यात व्यापारी बँकांमध्ये ७४ लाख ३ हजार ८८२ शेतकऱ्यांनी १ लाख २९ हजार ३२७ कोटी ६४ हजार, सहकारी बँकांनी १९ लाख ६६ हजार ८०, क्षेत्रीय ग्रामीण बँकांनी ८ लाख २४ हजार ६८४ शेतकऱ्यांना ८ हजार १२६ कोटींचे कर्ज वाटप केले आहे.

यामध्ये खात्यांची संख्या ही १० कोटी १९ लाख ४ हजार ६४६ एवढी आहे. यामधील बहुतांश कर्ज वर्षानुवर्षे थकीत आहे. ते फेडणे शेतकऱ्यांना अवघड जात आहे. त्यामुळे थकीत रक्कम आणि खात्यांची संख्या वाढत गेली आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये १ हजार ७९ कोटींचे कर्ज

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात चालू वर्षात खरीप हंगाम पीककर्जाचे उद्दिष्ट एक हजार ४३८ कोटी ८८ लाखांचे आहे. आतापर्यंत एक हजार ७९ कोटी २१ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, व्यापारी आणि ग्रामीण बँकांनी हे पीककर्ज वाटप केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : रायगड, रत्नागिरी, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगरला यलो अलर्ट

Education Department : शिक्षक पुरस्काराबाबत उदासीनता; १० तालुक्यांतून केवळ दोन-दोनच प्रस्ताव

Crime News : ‘मुलबाळ होत नाही’ म्हणून विवाहितेचा छळ; धारदार हत्याराने वार करून जीवे ठार मारल्याचा आरोप

'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’च्या शूटिंगला सुरुवात ! आदिती तटकरे यांच्या हस्ते मुहूर्त सोहळा संपन्न

SCROLL FOR NEXT