छत्रपती संभाजीनगर

आजवर जिल्ह्यातील १ लाख २९ हजार शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात १ हजार २४ कोटी रुपये जमा

CD
जिल्ह्यात १ लाख २९ हजार कर्जखात्यांत १ हजार २४ कोटी रुपये जमा सकाळ वृत्तसेवा छत्रपती संभाजीनगर, ता. ५ ः पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील १ लाख २९ हजार ३३९ शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांत १ हजार २४ कोटी ४ लाख रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे. अद्यापही जिल्ह्यातील २६ हजार ८५१ शेतकऱ्यांची ई-केवायसी (आधार प्रमाणीकरण) करणे बाकी आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक समृत जाधव यांनी दिली. कर्ज योजनेच्या पोर्टलवर जिल्ह्यातील विविध बॅंकांनी एकूण १ लाख ८९ हजार १७९ शेतकऱ्यांची माहिती अपलोड केली आहे. यापैकी १ लाख ६४ हजार १०४ शेतकऱ्यांची विशिष्ट क्रमांकासह यादी ई-केवायसीसाठी जारी करण्यात आली आहे. त्यापैकी १ लाख ३७ हजार २५३ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. ४ नोव्हेंबर अखेर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ८ हजार ७०९ कर्जखात्यांमध्ये ४० कोटी ५५ लाख रुपये, तर इतर बँकांच्या २७ हजार ३६२ कर्जखात्यांमध्ये २८४ कोटी ५६ लाख रुपये जमा झाले आहेत. अशा एकूण ३६ हजार ७१ कर्जखात्यांमध्ये ३२५ कोटी ११ लाख रुपयांचा निधी जमा करण्यात आला आहे. ----------- ई-केवायसी करणे बंधनकारक योजनेच्या पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या लाभार्थी याद्या जिल्ह्यातील सर्व बँक शाखा, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, आपले सरकार सेवा केंद्र, ग्रामपंचायती, तलाठी कार्यालये तसेच सहायक निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयांत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. ई-केवायसी करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी प्रसिद्ध झालेल्या यादीत आपले नाव असल्याची खात्री करावी. त्यानंतर संबंधित आपले सरकार सेवा केंद्रात जाताना मूळ आधार कार्ड, संबंधित क्रमांक व बचत खात्याचे पासबुक सोबत न्यावे आणि ई-केवायसी पूर्ण करून घ्यावी. ------ ((कोट)) ई-केवायसी करणे बाकी असलेल्या शेतकऱ्यांनी तत्काळ केवायसी करून घ्यावी, त्याशिवाय कर्जाच्या यादीत नाव आलेले असले तरी याचा लाभ मिळणार नाही. अधिक माहितीसाठी संबंधित बँक शाखा, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था किंवा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालयाशी संपर्क साधावा. - समृत जाधव, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था ----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahua Moitra: 'सीजेपीला विदेशातून नव्हे, तर भाजपकडूनच फंडींग!' भाजपच्या आरोपांवर महुआ मोइत्रांचा 'गुगली'?

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याला नवे नेतृत्व! राजवर्धन शिंदे तिसऱ्यांदा अध्यक्षपदी; संग्राम सोरटे उपाध्यक्ष

Latest Marathi News Live Update : "स्वीकृत संचालकांना मतदानाचा अधिकार दिल्यास तो कायदा आणि संविधानाच्या चौकटीत टिकणार नाही"; माजी सरन्यायाधीश बी. आर. गवई यांचा स्पष्ट कायदेशीर सल्ला

Ajit Jogi IAS to Chief Minister : राजीव गांधींच्या एका फोन कॉलवर IAS नोकरी सोडून राजकारणात प्रवेश करणारे अजित जोगी पुढे कसे बनले काँग्रेसचे सर्वात मोठे बंडखोर?

नाहीतर ते आज जिवंत असते... लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्या 'त्या' दोन गोष्टी, कसा झालेला त्यांचा मृत्यू?

SCROLL FOR NEXT