छत्रपती संभाजीनगर

वंचितची काळी दिवाळी

CD
फोटो क्रमांक- OSM26B07362 धाराशिव ः वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चटणी-भाकर खाऊन निषेध आंदोलन करताना पदाधिकारी व कार्यकर्ते. ------------- वंचित बहुजन आघाडीचे निषेध आंदोलन धाराशिव, ता. ९ (बातमीदार) : राज्यातील अनियमित पावसामुळे निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती, शेतकऱ्यांचे नुकसान, शेतमजुरांच्या हाताला काम नसणे आणि ग्रामीण भागातील कष्टकरी जनतेची आर्थिक ओढाताण या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रविवारी (ता. आठ) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळी दिवाळी निषेध आंदोलन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष धनंजय सोनटक्के यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चटणी-भाकर खाऊन शासनाच्या धोरणांचा निषेध नोंदविला. यावर्षी पावसाच्या अनियमिततेमुळे शेतकऱ्यांच्या हातात अपेक्षित पीक आले नाही. अनेक ठिकाणी पिके करपून गेली असून, जनावरांच्या चाऱ्याचा तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शेतमजुरांना रोजगार उपलब्ध होत नसल्याने ग्रामीण भागातील कष्टकरीवर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. त्यातच महागाई, बेरोजगारी आणि वाढत्या आर्थिक अडचणींमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन अधिकच कठीण झाले आहे. भूमिहीन नागरिक, शेतमजूर, रोजंदारी कामगार, परित्यक्ता महिला, पशुपालक, दूध उत्पादक, लघुउद्योजक आणि बेरोजगार युवक यांनाही या परिस्थितीचा मोठा आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे शासनाने दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना आखताना केवळ जमीनधारक शेतकऱ्यांचा विचार न करता सर्व बाधित घटकांचा समावेश करावा. प्रत्येक घटकासाठी स्वतंत्र मदत व पुनर्वसन योजना जाहीर करून पात्र लाभार्थ्यांना आर्थिक मदत द्यावी, या मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कवडकर यांना देण्यात आले. या आंदोलनात सोनटक्के यांच्यासह महासचिव नासिर शेख, फुले-आंबेडकर विद्वत सभेचे राज्य समन्वयक प्रा. डॉ. शहाजी चंदनशिवे, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष शीतल चव्हाण, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुधीर वाघमारे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख कुंदन वाघमारे, विकास बनसोडे, रुस्तम पठाण, महादेव एडके, रविकिरण बनसोडे, शेखर बनसोडे, भाऊसाहेब अणदुरकर, मिलिंद रोकडे, गोविंद भंडारे, जीवन कदम, कुंदन कांबळे, पृथ्वीराज वाघमारे, सुनील वाघमारे, गौतम गायकवाड, सागर चंदनशिवे, राहुल वाघमारे, आकाश पंडागळे, जयपाल सुरवसे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Politics : "गोकुळचं दार मी उघडलं म्हणून..."; महायुतीच्या दोन बड्या मंत्र्यांवर सतेज पाटलांचा थेट प्रहार!

Rocket Firecrackers Ban: दिवाळीच्या उत्साहावर नियमांचं बंधन! मुंबईत रॉकेट फटाक्यांवर बंदी; महापालिकेचा मोठा निर्णय

Mumbai Airport: मुंबईतून परदेशात जाणाऱ्या 'त्या' प्रवाशांना आता नवी मुंबई गाठावी लागणार? १२ कंपन्यांचा विरोध का?

Maharashtra Live News: जालना जिल्ह्यातील भिलपुरी गावात पोहोचले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Vivekanand Patil Gokul Politics : आम्हाला चोरमन नको, आमच्या हक्काचा चेअरमन हवा; गोकुळच्या मोर्चात विवेकानंद पाटील यांची आक्रमक तोफ धडाडली

SCROLL FOR NEXT