छत्रपती संभाजीनगर

पदवीधरसाठी जिल्ह्यात ७६ मतदान केंद्रे

CD
पदवीधरसाठी जिल्ह्यात ७६ मतदान केंद्रे ------ प्रारूप यादीबाबत राजकीय पक्षांकडून हरकती, सूचना मागविल्या ------ धाराशिव, ता. ५ ः महाराष्ट्र विधान परिषदेच्या ०५- औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, २३ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी जिल्ह्यात एकूण ७६ मतदान केंद्रे प्रस्तावित करण्यात आली आहेत. या मतदान केंद्रांच्या प्रारूप यादीबाबत राजकीय पक्षांच्या प्रमुख व प्रतिनिधींकडून हरकती, सूचना मागविण्यात आल्या आहेत. भारत निवडणूक आयोगाने २२ सप्टेंबरच्या या निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला. या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आणि प्रस्तावित मतदान केंद्रांची माहिती देण्यासाठी सहायक निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली. या बैठकीस उपजिल्हा निवडणूक अधिकारी, नायब तहसीलदार (निवडणूक) आणि विविध राजकीय पक्षांचे प्रमुख व पदाधिकारी उपस्थित होते. ---- तालुकानिहाय प्रस्तावित मतदान केंद्रे धाराशिव : १६ उमरगा : १२ तुळजापूर : ११ कळंब : १० भूम : ८ परंडा : ८ लोहारा : ६ वाशी : ५ ----- अंतिम यादी लवकरच होणार प्रसिद्ध बैठकीत मतदान केंद्रांच्या प्रारूप यादीवर विस्तृत चर्चा करण्यात आली. राजकीय पक्षांच्या प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करून ही प्रारूप यादी विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर निवडणूक आयोग व राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या अंतिम मान्यतेनंतर मतदान केंद्रांची निश्चित यादी जाहीर केली जाईल, अशी माहिती पुजार यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'आम्ही १५ वर्षांचे असताना असे नव्हतो...' Vaibhav Sooryavanshi बद्दल अभिषेक शर्मा नेमकं काय म्हणाला?

Gangapur News : अल्पवयीन पीडितेवर अत्याचार प्रकरणात आरोपीला ७ वर्षे सश्रम कारावास; गंगापूर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

विजय साळगावकर सुटलाच नसता, 'दृश्यम ३' मध्ये सगळ्यात मोठी चूक; पोलिसांनी दुर्लक्षित केली ती गोष्ट, तुम्हाला कळली का?

Wani News : दिंडोरीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने रास्ता रोको; शेतकरी, आदिवासी व नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन, दुष्काळी यादीत तालुक्याचा समावेश करण्याची मागणी

FlyDubai Co-Pilot Case : इस्रायलमध्ये विमान क्रॅश करण्याचा कट; फ्लाईदुबईच्या को-पायलटला होणार 'फायरिंग स्क्वॉड'द्वारे मृत्युदंड?

SCROLL FOR NEXT