छत्रपती संभाजीनगर

परिचारिकांच्या कायमस्वरूपी भरतीच्या लढ्याला यश

CD
परिचारिकांच्या कायमस्वरूपी भरतीच्या लढ्याला यश ३,९११ पदांची जाहिरात प्रसिद्ध, महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचा पाठपुरावा यशस्वी घाटी परिसर, ८ ः राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांमधील अधिपरिचारिकांची रिक्त पदे कायमस्वरूपी भरण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना, मुख्यालय लातूरने सुरू केलेल्या दीर्घ संघर्षाला अखेर यश आले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अधिपरिचारिकांची ३,९११ पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. २०२२ पासून संघटनेने कंत्राटी भरतीला विरोध करीत नियमित पदभरतीसाठी आंदोलने, निवेदने आणि मंत्रालयीन बैठकांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला. मे २०२२ मध्ये दहा दिवसांचे बेमुदत आंदोलन केले होते. त्यानंतर २०२३-२४ मध्ये सुमारे ४,२०० परिचारिकांची कायमस्वरूपी भरती झाली. मात्र, रिक्त पदांचा प्रश्न कायम असल्याने संघटनेने २०२५ मध्येही आंदोलन केले. जुलै २०२५ मध्ये वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कायमस्वरूपी भरतीसाठी कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले होते. मे २०२६ मध्ये मुंबईतील आझाद मैदानावरही तीन दिवस आंदोलन केले होते. संघटनेच्या राज्याध्यक्षा सुमित्रा तोटे, राज्यसरचिटणीस भीमा चक्रे, अरुण कदम यांच्यासह राज्य व शाखा पदाधिकारी आणि सभासदांनी या लढ्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. भरती प्रक्रियेतील ८०:२० स्त्री-पुरुष प्रमाणाची अट रद्द करावी, उर्वरित ७५० पदे आणि अतिरिक्त खाटांसाठी आवश्यक मनुष्यबळ मंजूर करावे, अशी संघटनेची मागणी कायम आहे. पात्र उमेदवारांना नियुक्त्या मिळेपर्यंत पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अय्यो, किती गोड! विकी-कतरिनाचाने शेअर केला मुलगा विहानचा पहिला फोटो, लेक दिसतो सेम टू सेम बाबासारखा

Samruddhi Magdum Death : लेकीच्या जन्माचा आनंद क्षणात विरला! आठ महिन्यांच्या गर्भवतीचा प्रसूतीवेळी अतिरक्तस्रावामुळे दुर्दैवी मृत्यू, मगदूम कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर

Rising Star Asia Cup: रिंकू सिंग भारतीय संघाचा उपकर्णधार! पाटीदारची अचानक माघार, सध्या निवड न करण्याची BCCI कडे विनंती

Ganga returns to Haridwar Har Ki Pauri : १८ दिवसांनंतर अखेर 'तिचे' पुनरागमन! ऐन दिवाळीच्या दिवशी वाहू लागला खळाळता प्रवाह; घाटांवर भाविकांचा महापूर

Pune Crime: लोणी काळभोरमध्ये खळबळ! खोकलाई चौकातून घरी निघालेली २७ वर्षीय विवाहिता बेपत्ता; अपहरणाचा संशय

SCROLL FOR NEXT