पोलिसांचे जिल्ह्यात एकाच
दिवशी २८ ठिकाणी छापे
----
दोन लाख ९५ हजारांचा मद्यसाठा जप्त; २८ गुन्हे दाखल
----
सकाळ वृत्तसेवा ः
धाराशिव, ता. १ ः जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत एकाच दिवशी तब्बल २८ ठिकाणी छापे मारण्यात आले. या कारवाईत सुमारे एक हजार ७५० लिटर गावठी दारूनिर्मितीचे गुळमिश्रित रासायनिक द्रव, ५७१ लिटर गावठी दारू आणि देशी-विदेशी दारूच्या ८१ सीलबंद बाटल्या असा एकूण दोन लाख ९५ हजार १८५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी महाराष्ट्र मद्यमनाई कायद्याअंतर्गत संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये एकूण २८ गुन्हे नोंदविण्यात आले.
पोलिस अधीक्षक रितू खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. भूम पोलिसांनी तीन ठिकाणी छापे मारून ३५० लिटर गूळमिश्रित रासायनिक द्रव व तीन लिटर गावठी दारू, रोहन ज्ञानोबा पौळ (रा. पाथरूड) याच्याकडून नऊ लिटर गावठी दारू, तर बाळ ज्ञानेश्वर मुरलीधर औताडे (रा. गोरमाळा) याच्याकडून ११ देशी-विदेशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. धाराशिव ग्रामीण पोलिसांनी येडशी, वरुडा आणि भानसगाव परिसरात कारवाई केली. यात ३३ लिटर गावठी दारू आणि देशी-विदेशी बाटल्या जप्त केल्या. बेंबळी पोलिसांनी ५० लिटर गावठी दारू आणि १२ सीलबंद बाटल्या जप्त केल्या. नळदुर्ग पोलिसांनी निलेगाव तांडा क्र. ०२ येथे कमळाबाई विठ्ठल राठोड हिच्याकडून ४०० लिटर, राणूबाई शाहू राठोड हिच्याकडून एक हजार लिटर गावठी दारूनिर्मितीचे गूळमिश्रित रासायनिक द्रव, तर बाळासाहेब महादेव राठोड याच्याकडून १५० लिटर गावठी दारू जप्त केली. लोहारा पोलिसांनी खेड येथून १५ सीलबंद बाटल्या आणि नागूर येथून आठ बाटल्या, धाराशिव पोलिसांनी शहरात भारत टॉकीज व सांजा रोड परिसरातून स्कूटीसह देशी-विदेशी मद्य, होंडा शाइन दुचाकी व मद्य, तर उमरगा पोलिसांनी इंदिरा चौकातून ३० लिटर गावठी दारू आणि डिग्गी रोड येथून २५ लिटर गावठी दारू जप्त केली. कळंब पोलिसांनी ६९ लिटर गावठी दारू, येरमाळा पोलिसांनी चोराखळी व येरमाळा सीडफार्म येथून ६२ लिटर गावठी मद्य, परंडा पोलिसांनी कौडगाव आणि परंडा येथून ४० लिटर गावठी मद्य, तर ढोकी व आंबी पोलिसांनी १०० लिटर गावठी दारू व २५ देशी-विदेशी सीलबंद बाटल्या जप्त केल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.