BJP
BJP Sakal
छत्रपती संभाजीनगर

सत्ता येऊनही भाजप ‘सायलेंट मोड’वर ! विजयाचे ‘सेलिब्रेशन’ नाही

प्रकाश बनकर

औरंगाबाद : राज्यात राजकीय भूकंपानंतर महाविकास आघाडी सरकारला घरी जावे लागले. यात ‘किंगमेकर’ असलेल्या भाजपने पुन्हा एकदा सत्ता काबीज केली आहे. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मात्र, भाजप सत्तेत येऊनही शहरातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये निरुत्साह दिसून येत आहे. एरवी देशभरातील लहान-मोठ्या विजयाचे ‘सेलिब्रेशन’ करणारे जिल्ह्यातील भाजपचे (BJP) पदाधिकारीही सत्तास्थापनेनंतर शांतच आहेत. केवळ सोशल मीडियावर शुभेच्छा देण्यात येत असल्याने सत्ता परिवर्तनानंतर भाजप शांत असल्याबद्दल राजकीय वर्तुळात आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. (Maharashtra Politics After Comes Into Power, BJP Officer Bearers Not Happy In Aurangabad)

शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या औरंगाबाद (Aurangabad) शहरात भाजपने मजबूत संघटन तयार केले आहे. यामुळे शिवसेनेला तोडीस तोड उत्तर देणारे लोकही पक्षात असल्यामुळे एक मजबूत पक्ष तयार झाला आहे, हे पक्षाने प्रत्येक आंदोलनातून आणि देशभरातील भाजपच्या विजयाच्या जल्लोषातून दाखवून दिले आहे. २० जूनपासून राज्यात शिवसेनेच्या बंडखोर आमदारांमुळे एकामागून एक धक्के बसत आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीपर्यंत भाजपमध्ये आनंदी वातावरण होते. सत्ता परिर्वतनात किंग ठरलेले देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन मंत्रिमंडळात सहभागी न होण्याचा घेतलेला निर्णय, त्यानंतर पक्षादेशानुसार उपमुख्यमंत्रिपदाची घेतलेली शपथ यामुळे अनेकांमध्ये नाराजीचा सूर दिसून आला. (Maharashtra Politics)

या निर्णयावर तर्क-वितर्क लावण्यात येत आहे. यात खुद्द भाजपचे पदाधिकारी संभ्रमात आहेत. दुसरीकडे शिंदे गटासोबत असलेल्या बंडखोर आमदारांच्या कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शपथ विधीनंतर जोरदार जल्लोष केला. भाजपतर्फे केवळ सोशल मीडियावर पोस्ट टाकून आभासी आनंदोत्सव साजरा केला जात आहे. नव्या सरकारमध्ये जिल्ह्यातील ज्येष्ठ आमदार हरिभाऊ बागडे आणि आमदार अतुल सावे यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार असल्याचेही बोलले जात आहे. असे असले तरी सध्या भाजप पदाधिकाऱ्यांचा हा सायलेंट मोड का आहे, याचेही उत्तर मिळालेले नाही. इतिहासात पहिल्यांदाच विधान परिषदेच्या विजयाचा जल्लोष भाजपने गुलमंडीवर मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला होता. तर आता सत्ता परिवर्तनानंतर मोठा जल्लोष होईल अशी अपेक्षा होती. मात्र, तसे काहीच झाले नाही.

कार्यकर्ते 'वेट ॲण्ड वॉच'च्या भूमिकेत

मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेले एकनाथ शिंदे आणि अन्य १२ बंडखोर आमदारांविरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याचा निकाल ११ जुलै रोजी लागणार आहे. या निर्णयावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असल्याने, या निकालानंतर चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र, आधी बहुमत सिद्ध करणे, त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय विरोधात लागल्यास काय अशा अनेक गोष्टींची चलबिचल सुरू आहे. यात मध्यवर्ती निवडणुका तर लागण्याची शक्यता तर नाही, ना असे अनेक गोष्टींची चर्चा सुरू असल्याने कार्यकर्ते 'वेट ॲण्ड वॉच' च्या भूमिकेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

Bangladesh MP Missing: भारतात आलेला बांगलादेशचा खासदार 3 दिवसांपासून बेपत्ता; कुटुंबाकडून चिंता व्यक्त

RSS नंतर आता दिग्विजय सिंह यांनी CM योगींचे केले कौतुक मात्र मोदींवर खोचक टीका, नेमकं काय म्हटलं वाचा...

Healthy Tips: आता कमी वयातच पोटाचा वाढतोय घेर, जास्त चरबीमुळे हृदयविकार, मधुमेह, आजारांना निमंत्रण

SCROLL FOR NEXT