Devendra Fadnavis Sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदापासून डावलले

ब्राह्मण समाजात नाराजीचा सूर

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असलेले देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्याचा आदेश दिल्यामुळे भाजपमध्ये ब्राह्मण समाजात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. फडणवीस हे ब्राह्मण जातीचे आहेत म्हणून त्यांना मुख्यमंत्रीपदापासून डावलले गेले असल्याचा आरोप परशुराम सेवा संघातर्फे करण्यात आला आहे.

परशुराम सेवा संघाने शनिवारी प्रसिद्धीपत्राकाद्वारे नाराजी व्यक्त केली आहे. या पत्रकानुसार, कधीही जातीयवाद न करणारे देवेंद्र फडणवीस हे एक असामान्य व्यक्ति आहेत, हे त्यांच्या कृतीतून वारंवार दिसून येते. जनसामान्यांच्या मनातील मुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या काळात केलेले काम उल्लेखनीय आहे.

नगरसेवक ते मुख्यमंत्री असताना केलेल्या कामात एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी सर्व जातीच्या लोकांना एकत्रित बांधून ठेवायचे काम केले आहे. दरम्यान महाराष्ट्र नाही तर गोवा, बिहार, हैदराबादमध्ये ही आलेल्या सत्तेत फडणवीस यांचे मोठे योगदान आहे. असे असताना फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी घ्यायला लावली. केवळ फडणवीस हे ब्राह्मण आहेत म्हणून त्यांना डावलण्यात आले असल्याचे पत्रकात म्हटले आहे.

पत्रकावर मिलिंद दामोदरे, केदार पाटील, साकेत खोचे, वसंत किनगांवकर, श्रीनिवास कुलकर्णी, विकास कुलकर्णी, विजया कुलकर्णी, जयश्री कुलकर्णी, विजया अवस्थी, विकास गोरवाडकर, सुधाकर तुंगार, रामचंद्र अंधारकर, अंजुषा कुलकर्णी, जयश्री अकोलकर, शिल्पा देशपांडे, महेश कुलकर्णी, अंजली जोशी, स्नेहल खेर्डेकर, स्मिता जोशी, अरविंद पाठक, गीता आचार्य, सोनिया जोशी, कल्याणी मुळे, धनंजय पांडे, विश्वनाथ दाशरथे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Strike: 11 सप्टेंबरला सार्वजनिक सुट्टी नाही तरी बँका बंद! सलग 4 दिवस बँका बंद राहणार? पाहा काय सुरू राहणार

Eknath Shinde: ठाकरे गटानंतर शिंदेसेनेला धक्का, बालेकिल्ल्यातील नगरसेवकाचे पद रद्द

iPhone 18 India Price: भारत ठरला iPhone 18 खरेदीसाठी जगातील दुसरा सर्वात महागडा देश! अमेरिकेपेक्षा तब्बल 50,000 रुपये जास्त!

US Open 2026: पहाटे ३.३३ वाजेपर्यंत रंगला थरार; ४ तास २८ मिनिटांच्या लढतीनंतर शेल्टनने गतविजेत्या अल्काराझला दिला धक्का

Marathi News Live Updates : पालिकेचा विरोध डावलून कॉरिडॉर होणारच; पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पोस्टने पंढरपुरात राजकीय वातावरण तापले

SCROLL FOR NEXT