Statement by Chandrakant Khaire in marathi esakal
छत्रपती संभाजीनगर

Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या राजकारणात होणार मोठा भूकंप, नंतर सरकार जाणार... कुणी केला दावा?

Shiv Sena NCP MLA disqualification hearing in Supreme Court : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील आगामी राजकारणावर सर्वांचे लक्ष लागले आहे.

Sandip Kapde

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी आता एकत्र होणार आहे. ३ स्पटेंबरला ही सुनावणी होणार आहे. अजित पवार गटाच्या ४१ आमदारांना नोटीस जारी करण्यात आली. अनेक दिवसांपासून ही सुनावणी लांबली आहे. दरम्यान ही सुनावणी झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होणार आहे आणि त्यानंतर सरकार जाणार असल्याचा दावा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. अब्दुल सत्तार यांच्यावर बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर आरोप:

"पालकमंत्री म्हणून अब्दुल सत्तार दोन महिने मजा करतील, नंतर सरकार जाणार आहे," असे खैरे म्हणाले. आमदार अपात्र सुनावणीत या वेळेस काही ना काही मोठा भूकंप होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

सुप्रीम कोर्ट सुनावणीबाबत:

"यावेळेस मात्र काही ना काहीतरी खूप मोठा भूकंप होईल. आमच्या जिल्ह्यातले पाच जण फुटले त्यातले चार जण या 16 पैकी आहेत. शंभर टक्के मुख्यमंत्री महाविकास आघाडीचा होईल, आम्ही तर म्हणतोय की उद्धव ठाकरेचे मुख्यमंत्री बनतील," असा विश्वास खैरे यांनी व्यक्त केला.

विधानसभा निवडणुकीवर चर्चा:

विधानसभा निवडणुकीवर बोलताना खैरे म्हणाले, "मला जर उद्धव साहेबांनी सांगितलं गद्दारांना पाडण्यासाठी तुम्ही सक्षम आहात तर मी लढायला तयार आहे. मी पश्चिम मतदारसंघाचा पहिला हिंदू आमदार आहे. नंतर मग दिल्लीत 20 वर्षे गेलो."

संजय शिरसाट यांच्यावर टीका:

"ठाकरे साहेब मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करतील. संजय शिरसाट कोण बोलणारा तो तर सत्ताधारी पक्षाचा प्रवक्ता आहे ना. सत्ताधारी पक्षाचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मराठा आरक्षणाबाबत काही बोलत नाहीत म्हणून हे रोज भांडण चाललंय," असे खैरे म्हणाले.

महाविकास आघाडीच्या तयारीबाबत:

"मी उद्धव साहेबांशी माझ्या इलेक्शनच अजून काही बोललो नाही, त्यांचा सर्वे होईल महाविकास आघाडी यावेळेस एक - एक उमेदवार निवडून आलाच पाहिजे अशा पद्धतीने उमेदवारी देईल," असे खैरे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Mumbai Expressway Accident : सीएनजी लिक होऊन धावती कार पेटली; वैष्णोदेवी दर्शनाहून परतणाऱ्या एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू

IPL 2026 : दोन मॅच, जिथे मुबंई इंडियन्सने माती खाल्ली! R Ashwin ने पोलखोल केली; म्हणाला, आता सर्व ६ सामने जिंकणे अशक्य

Latest Marathi News Live Update : नाथजलचे थंडगार पाणी १५ रुपयांलाच द्या - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

CBSE Parenting Calendar 2026-27: मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी नवा उपक्रम; सुजाण पालकत्वासाठी 'सीबीएसई'कडून पालकांसाठी मार्गदर्शक दिनदर्शिका जाहीर

Gold Rate Today: एप्रिलमध्ये सोनं स्थिर! आता महागणार का? खरेदीदारांनी काय करावं?

SCROLL FOR NEXT