प्रदूषण मंडळाच्या लालफितीच्या कारभाराला ब्रेक!
---
कंपन्यांच्या अर्जांचा होणार जलद निपटारा; नवीन कालमर्यादा लागू
---
छत्रपती संभाजीनगर, ता. ६ : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने उद्योगांच्या प्रस्तावांना त्वरित मंजुरी देण्यासाठी नवीन सुधारित कालमर्यादा नियमावली जारी केली. यामुळे औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर होऊन राज्य सरकारच्या ‘ईझ ऑफ डुइंग बिझनेस’ धोरणाला मोठा दिलासा मिळणार आहे.
नवीन उद्योग उभारणी किंवा विस्तारासाठी कंपन्यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून परवानग्या घ्याव्या लागतात. मात्र, हे अर्ज महिनोन् महिने प्रलंबित राहत असल्याने उद्योजकांमध्ये तीव्र असंतोष होता. या समस्येची दखल घेत मंडळाने अर्जांवर वेगाने आणि पारदर्शकपणे कारवाई करण्यासाठी नवी मुदत निश्चित केली.
---
कडक अंमलबजावणी आणि इशारा
ही नियमावली पुढील १५ दिवसांत प्राप्त होणाऱ्या सर्व अर्जांना लागू होईल. यापूर्वीचे कालमर्यादाविषयक नियम रद्द करण्यात आले. दिलेली मुदत ही कमाल मर्यादा असली, तरी अधिकाऱ्यांनी त्याआधीच प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. कामात टाळाटाळ केल्यास किंवा मुदतीत काम न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा दिला.
---
परवानग्यांसाठी निश्चित केलेली नवीन कालमर्यादा
१. ग्रीन श्रेणी
पहिली संमती/नूतनीकरण/विस्तार : ३० दिवस
--
२. ऑरेंज श्रेणी
पहिली स्थापना संमती : ३० दिवस
पहिली संचालन संमती/नूतनीकरण : ४५ दिवस
--
नूतनीकरण किंवा विस्तार : ९० दिवस
३. घनकचरा व्यवस्थापन नियम
‘क’ वर्ग नगरपालिका : ६० दिवस
‘ब’ वर्ग नगरपालिका व कॅन्टोन्मेंट बोर्ड (प्रादेशिक अधिकारी/आरओ अंतर्गत) : ६० दिवस
‘अ’ वर्ग नगरपालिका (विभागप्रमुखाअंतर्गत) : ६० दिवस
सर्व महानगरपालिका (संमती समिती/सीसी अंतर्गत) : ६० दिवस
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.