छत्रपती संभाजीनगर

नागरिकांना गतिमान आणि कालबद्ध सेवा द्या सेवा हक्क आयुक्त डॉ. किरण जाधव;

CD
नागरिकांना गतिमान, कालबद्ध सेवा द्या ----- सेवा हक्क आयुक्त डॉ. किरण जाधव; प्रथम अपिलीय अधिकाऱ्यांनी प्रकरणांचा निपटारा करावा ----- लातूर, ता. ५ : नागरिकांना पारदर्शक, गतिमान आणि कालबद्ध सेवा मिळावी, यासाठी राज्यात महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम लागू करण्यात आला आहे. या अधिनियमांतर्गत अधिसूचित विविध शासकीय सेवांचा लाभ नागरिकांना नियत कालावधीत उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. अशा सेवा उपलब्ध न झाल्याने प्रथम अपिलीय अधिकाऱ्यांकडे आलेली प्रकरणे सुनावणी घेऊन विहित कालावधीत निकाली काढावीत, अशा सूचना छत्रपती संभाजीनगर विभागाचे राज्यसेवा हक्क आयुक्त डॉ. किरण जाधव यांनी येथे दिल्या. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत अधिसूचित सेवांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुलकुमार मीना, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त राहुल कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी शिल्पा करमकर, उपजिल्हाधिकारी गणेश पवार, सायली ठाकूर, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब वाघ यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत अधिसूचित सेवांसाठी प्राप्त अर्ज प्रलंबित राहू नयेत, यासाठी संबंधित विभाग प्रमुखांनी नियमितपणे आढावा घेऊन पाठपुरावा करावा. तसेच प्रथम अपिलीय अधिकारी यांनी आपल्या अधिनस्त पदनिर्देशित अधिकाऱ्यांच्या कामगिरीचा वार्षिक आढावा घ्यावा. प्रथम अपिलीय अधिकारी यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक प्रकरणाची सुनावणी घेऊन त्यामध्ये अर्जदाराचे समुपदेशन करून त्याला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी प्रयत्न करावा. अनेकदा अर्जातील किंवा कागदपत्रांमधील त्रुटींची व्यवस्थित माहिती नसल्यामुळे अशी अपिले झालेली असतात. त्या अनुषंगाने अर्जदाराचे समुपदेशन गरजेचे आहे, असे डॉ. जाधव यांनी सांगितले. --- भूमी अभिलेख कार्यालयास भेट अधिसूचित सेवांबाबत कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी डॉ. जाधव यांनी लातूर येथील जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संवाद साधून महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत अधिसूचित सेवांबाबतच्या कामकाजाचा आढावा घेतला. तसेच आनुषंगिक बाबींविषयी मार्गदर्शन केले. यावेळी भूमी अभिलेख उपअधीक्षक तथा प्रभारी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख वैशाली गवई, उदगीरचे उपअधीक्षक किशोरकुमार कोरे, रेणापूरच्या उपअधीक्षक रेश्मा शिंदे, औसाचे उपअधीक्षक निखिल मोरे आदी उपस्थित होते. --

PNEUMONIC PLAGUE: रशियातील लॅबमध्ये काम करणाऱ्या तरुणीचा मृत्यू; नक्की काय आहे 'न्यूमोनिक प्लेग'? जाणून घ्या कारणं आणि लक्षणं

Dearness Allowance Hike: कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! व्हेरिएबल डीए वाढला; नेमका किती आणि कोणाला फायदा होणार?

२ केंद्रीय मंत्र्यांचा पत्ता कट होणार, मोदी कॅबिनेटमध्ये फेरबदलाच्या चर्चांना उधाण; ५ जागा रिक्त, आप-शिवसेनेला संधी?

Australia A विरुद्ध सुरु होणार ODI मालिका! हार्दिक, नमनची माघार; तरीही भारताची तगडी फौज मैदानात; जाणून घ्या डिटेल्स

Pune News : मनोज जरांगे यांना प्रश्‍न विचारल्‍याने ट्रोलधाड; रेखा कोंडे यांचा जरांगेंवर आरोप, टेंडर प्रक्रियेवरून मनोज जरांगे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT