छत्रपती संभाजीनगर

भरती परीक्षेवर आता ‘पारदर्शक’ नजर!

CD
भरती परीक्षेवर आता ‘पारदर्शक’ नजर! ---- गैरप्रकार रोखण्यासाठी उच्चस्तरीय समिती; विद्यार्थ्यांनी सूचना द्याव्यात ---- बीड, ता. १७ : राज्यातील शासकीय भरती परीक्षांमधील गैरप्रकारांना कायमचा पूर्णविराम देत संपूर्ण परीक्षा पद्धत अधिक सक्षम, पारदर्शक व उमेदवाराभिमुख करण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. या प्रक्रियेत प्रत्यक्ष परीक्षार्थी, विद्यार्थी व नागरिकांचा सहभाग नोंदविण्यासाठी बीड जिल्ह्यातील सर्व घटकांनी आपल्या सूचना, अभिप्राय व हरकती नोंदवाव्यात, असे आग्रही आवाहन छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी केले आहे. ​भरती प्रक्रियेतील त्रुटी दूर करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठित केली आहे. ही समिती राज्यातील प्रत्येक महसुली विभागात जाऊन सर्व हितधारकांशी प्रत्यक्ष संवाद साधत आहे. या अनुषंगाने ही समिती येत्या २१ सप्टेंबरला सकाळी साडेदहाला छत्रपती संभाजीनगर येथील स्मार्ट सिटी कार्यालयात भेट देणार आहे. ​बीड जिल्ह्यातील विद्यार्थी, पालक, अभ्यासिकाचालक व शिक्षकांना आपल्या सूचना सहज मांडता याव्यात, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. हा कक्ष शुक्रवारी (ता. १८) सायंकाळी सहापर्यंत खुला राहील. ज्यांना प्रत्यक्ष जाणे शक्य नाही, ते ई-मेलद्वारेही निवेदने पाठवू शकतात, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी दिली. ---- ((कोट)) स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकार रोखून पारदर्शकता आणण्यासाठी शासनाने पावले उचलली आहेत. बीड जिल्ह्यातील विद्यार्थी, पालक, कोचिंग क्लासेस, अभ्यासिकाचालक व लोकप्रतिनिधींनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेऊन आपल्या व्यावहारिक सूचना व हरकती १८ सप्टेंबरपर्यंत लेखी किंवा ई-मेलद्वारे नोंदवाव्यात. - शिवकुमार स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी, बीड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NTA Exam Calendar 2026-27 Out : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! जेईई मेन, यूजीसी-नेटसह प्रमुख परीक्षांच्या तारखा जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक

Shivsena Case : शिंदे गटाला पक्ष, धनुष्यबाण चिन्ह देताना कोणते निकष? सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला थेट सवाल, सुनावणीत नेमकं काय घडलं?

'कौलारू माडी गं, हिरव्या बागा कोकणा...' गाण्यावर वर्षा उसगावकर, किशोरी शहाणे यांचा जबरदस्त डान्स; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणतात-

Latest Marathi News Update : 'निवडणूक आयोगाला आपली घटनात्मक कर्तव्ये पार पाडण्यापासून अनिश्चित काळासाठी रोखले जाऊ शकत नाही'

Manoj Jarange Patil: "विषय फिट बसला!" 58 लाख नोंदींवर जरांगेंचा मोठा दावा

SCROLL FOR NEXT