रेशनवरील धान्यवाटपात वेगळा निकष
कळंब, ता. ११ (बातमीदार) : जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झाल्याने शेतकरी आणि सर्वसामान्य कुटुंबे आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत. अशा परिस्थितीत सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत धान्यवाटपात धाराशिव जिल्ह्यासाठी वेगळा निकष लागू असल्याचा मुद्दा समोर आला आहे.
धाराशिव जिल्ह्यात एक किलो तांदूळ आणि चार किलो गहू दिला जात आहे. गेल्या पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या या बदलामुळे लाभार्थ्यांमध्ये नाराजी वाढली आहे. शासनाकडून पात्र लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती पाच किलो मोफत धान्य दिले जाते. अनेक गरीब कुटुंबांचा उदरनिर्वाह या धान्यावर अवलंबून असतो. कुटुंबातील सदस्यांच्या दैनंदिन गरजा लक्षात घेता तांदळाचे प्रमाण कमी झाल्याने अडचणी वाढत असल्याचे चित्र आहे.
तांदळाचे प्रमाण दोन किलोवरून एक किलो आणि गव्हाचे प्रमाण तीन किलोवरून चार किलो करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. हा बदल नेमक्या कोणत्या शासन निर्णयानुसार करण्यात आला, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
-----
रेशनवरील तांदळाचे प्रमाण कमी झाल्याने धान्य घेण्यासाठी येणारे अनेक कार्डधारक गहू कमी देऊन तांदूळ वाढवून देण्याची मागणी करतात. मात्र, शासनाकडून जेवढे धान्य उपलब्ध होते, तेवढेच नियमानुसार वाटप करावे लागते. धान्याचे प्रमाण वाढविण्याचा अधिकार आमच्या हातात नाही. कार्डधारकांची मागणी रास्त असली, तरी त्यांच्या पसंतीनुसार धान्य देणे शक्य होत नाही
-किरण बोराडे, धान्य दुकानदार
-----
आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह रेशनवर मिळणाऱ्या धान्यावरच अवलंबून आहे. पूर्वी दोन किलो तांदूळ आणि तीन किलो गहू मिळत होता. आता तांदळाचे प्रमाण कमी करून गहू वाढविण्यात आला आहे. आम्हाला गव्हापेक्षा तांदळाची गरज अधिक आहे.
-ताई काळे, वाकडी, ता. कळंब
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.